मुनगंटीवार वनमंत्री राहण्याच्या लायकीचे नाहीत – प्रिती मेनन

मुनगंटीवार वनमंत्री राहण्याच्या लायकीचे नाहीत – प्रिती मेनन

आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन

आम आदमी पार्टी (आप)च्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीवरून सरकारवर कसून टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री राहण्याच्या लायकीचे नाही असे वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मुंबई पत्रकार संघात आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या. अवनी वाघिणीच्या शिकारानंतर सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. यापूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

मेनन यांच्या भाषणातील मुद्दे 

सुधीर मुनगंटीवार यांनी अवनीची सुपारी किलिंग केली, रिलायन्स आणि दुसऱ्या उद्योगपती यांच्या सिमेंट, आणि इतर कंपन्यांसाठी या ठिकाणी असलेल्या जंगलाच्या जागा रिकाम्या करण्यासाठी मुनगंटीवार यांनी ही अवणीची हत्या केली. मुनगंटीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करावी, जी समिती सरकारने नेमली आहे, ती आम्हाला मान्य नाही, त्यासाठी ती रद्द करून न्यायाधीशाच्या मार्फत ही चौकशी समिती नेमली जावी.

त्यासाठी केवळ भाजप नाही तर काँग्रेसही यात सामील आहे. काँग्रेसच्या काळात या ठिकाणी खनिज संपत्ती दडलेली ५०० हेक्टर जमीन रिलायन्स देण्यात आली होती. नंतर रिलायन्सने ती हर्षवर्धन लोढा यांना ४ हजार ८०० कोटीला विकली..आता ही जमीन आणि आजूबाजूचं जंगल खाली करून ती या उद्योगपती यांना देण्यासाठीचे षडयंत्र रचले जात आहे

 

First Published on: November 10, 2018 5:31 PM
Exit mobile version