सुट्टीसाठी बॉसशी बोलला खोटं! रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट आणि…

सुट्टीसाठी बॉसशी बोलला खोटं! रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट आणि…

प्रातिनिधिक फोटो

रोजच्या कामातून जरा ब्रेक मिळावा आणि सुट्टी घेऊन काही दिवस वैयक्तिक जीवन जगावे असे प्रत्येकाच्याच मनात येत असते. मात्र ऑफिस आणि ऑफिसमधील कामाचा वाढता व्याप लक्षात घेता ऑफिसचा बॉस किंवा वरिष्ठ सुट्टी देण्यासाठी लवकर तयार होत नाही. ऑफिसचे काम आणि सतत येणारा दबाव वाढला की, मानसिक तणाव आपल्याला जाणवतो. अशावेळी तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगून सुट्टी घ्याल किंवा एखादं कारण सांगून सुट्टी मागाल. मात्र अमेरिकेत असा काही प्रकार घडला तो ऐकून तुम्ही थक्कच व्हाल…

असा घडला प्रकार

अमेरिकेतील अॅरिझोनामधील कूलिजमध्ये एका १९ वर्षीय तरूण कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी म्हणून असे काही केले की, हा प्रकार ऐकताच सगळेच हैराण झाले. या तरुणाला त्यानं रचलेल्या कटामुळे पोलिसांनी अटक केली आहे. अमेरिकेतील अॅरिझोनामधील हा सर्व प्रकार आहे. ब्रँडन सुल्स असं या १९ वर्षांच्या तरुणाचे नाव असून तो एका टायरच्या कारखान्यात काम करत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडन सुल्स असं या तरुणाचे नाव असून तो एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. तेथे असणाऱ्या एका पाण्याच्या टाकीजवळ तो  दिसला. यावेळी त्याचे हात बांधलेले होते आणि तोंडात कापडं कोंबलेल्या अवस्थेत तो आढळला. यावेळी एका नागरिकाने त्याला पाहिले आणि याची माहिती पोलिसात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले दोन व्यक्तींनी अपहरण केल्याचा दावा ब्रँडनने केला होता. दोन जणांनी आपल्याला बेशुद्ध करुन एका वाहनात टाकून अज्ञात स्थळी फेकून दिले, असा ब्रँडनचा दावा होता. त्याचे हात बांधलेले आणि तोंडात कापडाचा गोळा घातलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडला असल्याचे एका व्यक्तीने पाहिले, असेही ब्रँडनने सांगितले होते.

ब्रँडनचे अपहरण झालेच नव्हते, तर त्याने अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली होती. या अपहरणाचा तपास सुरु केला असता, ब्रँडनचं अपहरण झालंच नव्हतं, तर त्यानं अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले. तर या आरोपावरुन या तरुणाला अटक करण्यात आल्याचीही माहिती मिळतेय.

First Published on: February 25, 2021 12:11 PM
Exit mobile version