साडीवर कोट घातलेल्या ‘अम्मा’चा डान्स पाहीलात का ?

साडीवर कोट घातलेल्या ‘अम्मा’चा डान्स पाहीलात का ?

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ कोणा सेलिब्रिटीचा नसून एका जेष्ठ महिलेचा  आहे. पुद्दूचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात साडीवर गुलाबी रंगाचा कोट घातलेली एक महिला मजेशीर ठेक्यावर ताल धरताना दिसत आहे. हजारो यूजर्सनी हा व्हिडीओ बघितला असून राऊडी बेबी गाण्यावर अम्माने धरलेला ठेका सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणत आहे.

येथील महापालिकेच्या आवारात महिला कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पोंगल साजरा केला. याकार्यक्रमात उपराज्यपाल किरण बेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पोंगल सणाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलाही मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या. पण या सगळ्यांमध्ये अम्माच्या डान्सने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. धनुष या अभिनेत्याच्या राऊडी बेबी या गाण्यावर अम्माने असा काही ठेका धरला की हसून हसून सगळेच लोटपोट झाले. बेदी यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवर अम्माच्या डान्सचा व्हिडीओ शेयर केला आहे. यात इतर महिला कर्मचारी अम्माला चियर करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट केल्या असून अम्माचा डान्स सगळ्यांनाच आवडल्याचे सांगितले आहे.

First Published on: January 18, 2020 5:38 PM
Exit mobile version