अनिल कुंबळेंच्या फोटोग्राफीची कमाल; माया वाघिणीचा फोटो ठरतोय चर्चेचा विषय

अनिल कुंबळेंच्या फोटोग्राफीची कमाल; माया वाघिणीचा फोटो ठरतोय चर्चेचा विषय

माया वाघिण

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने क्रिकेटसोबतच आपला फोटोग्राफीचा छंदही जोपासला आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिया ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाला कुंबळे याने मे महिन्यात भेट दिली होती. यावेळी त्याने आपल्या कॅमेऱ्यातून माया वाघिणीचा फोटो काढला होता. नुकतेच हे फोटो कुंबळेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

वाघ आणि वाघिण यांचा जंगलात विशिष्ट परिसर असतो. आपल्या परिसरात ते इतर वाघांना येऊ देत नाहीत. अनिल कुंबळेंनी जेव्हा हा फोटो काढला तेव्हा माया आपल्या परिसरातून दुसऱ्या वाघिणीला हकलवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी या दोन वाघिणींमध्ये झटापटही झालेली पाहायला मिळत आहे. कुंबळेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माया वाघिणीला पाहण्याची मी वाट पाहत होतो. माया वाघिण आपल्या परिसराला वाचविण्यासाठी दुसऱ्या वाघिणीसोबत झगडत आहे. दोघींची झटापट सुरु असताना हे फोटो घेतले आहेत.”

कुंबळेच्या या ट्विटला जवळपास ११ हजार लोकांनी लाईक केले आहे, तर ७५० हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. कुंबळेचे ट्विटरवरील फॉलोअर्सला देखील हे फोटो खूप आवडले असून त्यांनी कमेंटमध्ये फोटोंबद्दल कौतुक केले आहे.

 

First Published on: November 29, 2019 3:51 PM
Exit mobile version