१० नवीन चंद्रांचा शोध !

१० नवीन चंद्रांचा शोध !

गुरू ग्रहाचे नवीन उपग्रह (प्रातिनिधिक फोटो)

सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह अर्थात गुरु. खगोलशास्त्रज्ञांनी नुकतेच गुरुचे १० नवीन चंद्र (उपग्रह) शोधून काढले आहेत. या शोधामुळे गुरुच्या उपग्रहांची एकूण संख्या आता ६९ झाली आहे. विशेष म्हणजे गुरुच्या उपग्रहांची संख्या अन्य उपग्रहांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. सर्वाधिक उपग्रह असलेल्या ग्रहांच्या तुलनेत असलेल्या ग्रहांच्या यादीमध्ये आता गुरुने पहिले स्थान पटकवले आहे. खगोल शास्त्रज्ञांची एक टीम सूर्यमालेच्या परिघाबाहेर असलेल्या खगोल विश्वाचा शोध घेत होती. या मोहिमेमध्ये त्यांना गुरु ग्रहाच्या या १० नव्या उपग्रहांचा शोध लागला. या शोध मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांना १२ लहान आकाराचे उपग्रह आढळले. त्यापैकी २ उपग्रह हे जुनेच असून १० उपग्रह नव्याने आढळले असल्याचं समोर आलं. शास्त्रज्ञांनी मंगळवारी या शोधाची अधिकृत घोषणा केली.

गुरू ग्रह- प्रातिनिधिक फोटो

विचित्र गोळा

खगोलशास्त्रज्ञांनी यापैकी एका उपग्रहाला ‘विचीत्र गोळा’ असं नाव दिलं आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या उपग्रहाची कक्षा (ऑर्बिट) सामान्य कक्षेपेक्षा वेगळी असल्यामुळे त्याला हे खास नाव देण्यात आलं आहे. दरम्यान नव्याने शोध लागलेले हे १० उपग्रह आकाराने खूपच छोटे असल्यामुळे त्याचा शोध लागण्यास उशीर झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

First Published on: July 18, 2018 2:37 PM
Exit mobile version