अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ‘चिंताजनक’

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ‘चिंताजनक’

अटल बिहारी वाजपेयी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वेंटिलेटरवर असलेल्या अटलजीच्या प्रकृती स्वास्थ्याची माहिती देण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन देण्यात आले. यात त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. आता पुढीस काही वेळात आणखी एक बुलेटीन जारी करण्यात येणार असून  त्यानंतर त्यांच्या प्रकृती संदर्भातील अधिक माहिती कळू शकेल. सध्या एम्स रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी राजकीय वर्तुळातील मंडळीनी हजेरी लावली आहे.

अटलजींच्या प्रकृतीची केली चौकशी

अटलजींवर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात २ महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कालपासून रुग्णालयात अनेकांनी त्यांची भेट घेतली. सकाळपासून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भाजप अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजप खासदार विजय गोयल, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री पियुष गोयल,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन अटलजींच्या प्रकृतीची विचारणा केली.

अनेक ठिकाणी पूजा-अर्चा

अटलजीच्या प्रकृतीसाठी अनेक ठिकाणी पूजा-अर्चा सुरु आहे. अटलजींच्या प्रकृती स्वास्थासाठी ही पूजा देशातील विविध भागातून केली जात आहे. त्यांना मानणाऱ्या अनेकांनी एम्स रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. ही गर्दी वाढत असल्यामुळे पोलिसांनाही अडथळा येत असून प्रसारमाध्यमांनाही बाहेक काढण्यात आले आहे.

(सौजन्य-ANI)

First Published on: August 16, 2018 10:35 AM
Exit mobile version