‘बाप’ माणूस! वर्षभरात मिळवला २३ मुलांच्या बापाचा मान!

‘बाप’ माणूस! वर्षभरात मिळवला २३ मुलांच्या बापाचा मान!

'बाप' माणूस! वर्षभरात मिळवला २३ मुलांच्या बापाचा मान!

एकाच वर्षात एक तरुण २३ मुलांचा बायोलॉजिकल बाप बनला आहे. खरंतर तो सुरुवातील हौस म्हणून शुक्राणू देत होता. परंतु नंतर त्याने पूर्ण वेळ अशीच नोकरी केली. त्यामुळे सध्या तरुणांच्या या कृत्याचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियामधील आहे.

या तरुणाचे नाव एलन फान असे आहे. एलन ऑस्ट्रेलिया देशात शुक्राणू दान (स्पर्म डोनेट) करण्यासाठी खूप लोकप्रिय झाला आहे. हा तरुण म्हणतो की, ‘महिला शुक्राणू हेल्थी असल्यामुळे मला पसंत करतात.’ डेली मेलच्या वृत्तानुसार, एलन स्वतः दोन मुलांचा बाप आहे. परंतु त्यांनी खासगी पद्धतीने शुक्राणू दान करून जवळपास २३ मुलांना जन्म दिला आहे. हा तरुण रजिस्टर्ड फर्टिलिटी सेंटरमध्ये देखील शुक्राणू दान करतो.

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेनमध्ये राहणारा एलनचा आता तपास केला जात आहे. काही फर्टिलिटी क्लिनिकने एलन विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने कायदेशीर क्लिनिकमधून शुक्राणूंचे दान केले आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मुले जन्माला दिली, असा आरोप एलनवर लावला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरियाच्या कायद्यानुसार एक पुरुष फक्त १० ‘कुटुंब’ तयार करू शकतो. एलनने सांगितले आहे की, ‘महिलांना नकार देणे हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे त्याने एक दिवसात तीन महिलांना शुक्राणू दान केले.’


हेही वाचा – Video: लग्नात एका महिलेनं असं काही गिफ्ट दिलं जे पाहून नवरा हडबडला!


 

First Published on: November 29, 2020 6:34 PM
Exit mobile version