सोशल मीडियावर पोस्ट करताना ही घ्या काळजी; अन्यथा गमवाल नोकरी

सोशल मीडियावर पोस्ट करताना ही घ्या काळजी; अन्यथा गमवाल नोकरी

जगभरातील ९९ टक्के लोकं ही सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर बऱ्याच जणांना व्यक्त होण्याची आवड असते. तसेच, सोशल मीडिय़ाचा वापर काही जण व्यावसायिक कारणांसाठी करतात. मात्र, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर तुम्हाला हवा तसा करता येणार नाही. तुमच्या वापरावर बंधनं येणार आहे. यासंदर्भात एक सर्वेक्षण देखील करण्यात आला होता. याला ४० टक्के भारतीयांनी सहमती दर्शवली आहे.


हेही वाचा-  रानूच्या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला का?; माय-लेकींचा व्हिडिओ व्हायरल


कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी बनवली सोशल मीडिया पॉलिसी

सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपले खाजगी फोटो किंवा माहिती पोस्ट करून अपडेट राहणं अनेकांना आवडते. मात्र अनेक कंपन्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यांकरिता सोशल मीडिया पॉलिसी तयार केली आहे. या पॉलिसीनुसार कोणत्याही वादग्रस्त असलेल्या विषयावर लिहून पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. या पॉलिसीमुळे कर्मचाऱ्यांना राजकीय, सामाजिक विषयांवर आता मोकळेपणाने बोलता येणार नाही.

तुमच्या ओळखीसह कंपनीचे नाव देखील महत्त्वाचे

अनेकदा मोठाले कलाकार मंडळी, नेत्यांना एखाद्या विषयावर बोलताना बघत असतो. मात्र एखाद्यावेळी अपशब्द किंवा अवाक्षर बोलले गेल्यास त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांना तेच जबाबदार असतात. मात्र अशावेळी तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कंपनीचे नाव देखील खराब होऊ शकते, असे McAfee चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजिंग डायरेक्टर वेंकट कृष्णापूर यांनी सांगितले. त्यामुळे काही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता पॉलिसी तयार केली आहे. जर कंपनीने तयार केलेल्या नियमांचे (पॉलिसी) पालन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केले नाही तर, त्यांची नोकरी जाऊ शकते.

त्यामुळे जर तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर ते कोणत्या विषयाशी संबंधित आहे, पोस्ट केल्यानंतर त्याच्या काही प्रतिक्रिया तर उमटणार नाही ना? याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही चुकीची पोस्ट शेअऱ केली तर तुमच्या नावासह कंपनीची पत देखील खालावली जाण्याची शक्यता असते. त्य़ामुळे पोस्ट करत असाल तर सावधान! अन्यथा नोकरी गमवाल…

First Published on: September 11, 2019 11:54 AM
Exit mobile version