१०४ वर्षानंतर दिसणार आहे चंद्राचं निराळं रूप

१०४ वर्षानंतर दिसणार आहे चंद्राचं निराळं रूप

प्रातिनिधिक फोटो

जुलै महिन्यामध्ये चंद्रग्रहणाचा योग आहे. जुलै महिन्याच्या २७ तारखेला २१ व्या शतकातील सगळ्यात मोठे आणि सर्वात जास्त वेळ चालणारे चंद्रग्रहण लागणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जवळ जवळ १०४ वर्षानंतर हे ग्रहण होणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर फरक पडणार आहे. काही ठराविक राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला खग्रास चंद्र ग्रहण होणार आहे. हे चंद्र ग्रहण १ तास ४३ मिनिटं असणार आहे. जे भारतात दक्षिण अमेरिका, अफ्रिका, पश्चिम आशिया तसेच ऑस्ट्रेलिया, युरोप मध्ये हे चंद्र ग्रहण दिसणार आहे.

देशात सर्वच भागात दिसणार हे ग्रहण

यावर्षीच्या ३१ जानेवारी २०१८ मध्ये चंद्रग्रहण झाले होते. आता येत्या जुलैमध्ये होणारे चंद्रग्रहण हे ब्लडमून असणार आहे. असं म्हंटलं जातं की, यावर्षीच्या जानेवारी महिन्यात ब्लड मून, सुपर मून पाहण्याचा योग काही देशात आला होता.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार देशात सर्वच भागात हे ग्रहण दिसणार आहे.

यांना लाभणार चंद्र ग्रहण

काही ठराविक राशींवर या ग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. मेष, सिंह, वृश्चिक या राशीसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. तर मिथुन, तुळ, मकर, कुंभ, राशीसाठी हे चंद्रग्रहण इतकं लाभदायक नसणार आहे. या राशीतील लोकांनी शंकर आणि हनुमनाची उपासना केल्यास या चंद्रग्रहणातील दुष्परिणामाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.

First Published on: June 27, 2018 5:53 PM
Exit mobile version