बॉलिवूडमध्ये आरोपाचे सत्र सुरुच

बॉलिवूडमध्ये आरोपाचे सत्र सुरुच

बॉलिवूडमध्ये गैरवर्तनाच्या आरोपाचे सत्र सुरु झाले आहे. #metoo मोहीमेत अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात केलेल्या आरोपानंतर अनेक प्रकरण समोर आली आहेत. बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौतने दिग्दर्शक विकास बहल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विकास बहल यांनी दिग्दर्शन केलेल्या क्वीन चित्रपटामध्ये कंगना ही मुख्य भूमिकेत होती. कंगनाने केलेल्या आरोपाअंतर्गत विकास हा अश्लील संभाषण करत होता. विकासने अनेकदा चूकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला असल्याचा आरोप तिने केला. २०१५ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनी विकासवर केला आहे. या महिलेच्या आरोपाचे समर्थन कंगनाने केले आहे. पूर्व अभिनेत्री तनुश्री दत्ता ने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हे सत्र सुरु झाले आहे. मात्र, अन्यायाची तक्रार वेळीच का केली नाही याप्रश्नावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.

काय आहे प्रकरण?

‘फॅन्टम फिल्म्स’ या प्रोडक्शन हाउसमधील एका महिला कर्मचाऱ्यानी विकास बहल याच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गोवा प्रवासा दरम्यान विकसने तिचा विनयभंग केला होता. यानंतर कंगनाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखातीत विकासवर गंभीर आरोप केलेत.

कंगना म्हणाली की,”महिलेने केलेल्या आरोपांवर मला विश्वास आहे. २०१३ मध्ये क्वीन चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्याने अनेकदा माझी छेड काढली होती. विवाहित असून देखील विकास माझ्याशी अश्लील संभाषण करत होता. आम्ही रोज पार्टी करत होतो. पार्टी नंतर परत जात असताना त्याने अनेकदा मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला. शुटिंगदरम्यान त्याचे अनेक मुलींसोबत लैंगिक संबध होते. मला जेव्हापण विकास भेटत होता त्यावेळी चूकीच्या पद्धतीने त्याने मिठी मारली. माझ्या केसांचा वास घेत होता. काही दिवसांपूर्वी विकास माझ्या कडे एक स्क्रीप्ट घेऊन आला होता. मात्र मी या महिलेला पाठिंबा देते आहे म्हणून त्याने माझ्याशी बोलन थांबवले. मात्र, मला त्याने काही फरक पडत नाही.”

फॅन्टम फिल्म्स बंद झाल्यानंतर आता अनुराग कश्यपने ट्वीट केल आहे.

 


दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी सांगितले की,”विकास,मधू,अनुराग आणि मी यांनी एकत्र फॅन्टम फिल्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवास माझ्या जिवनातील खूप चांगला प्रवास ठरला. माझे तिन्ही सहकारी माझ्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे आहे.”

कैलास खेर वरही लागले आरोप

प्रसिद्ध अल्लाह के बंदे या गाण्याचा गायक कैलास खेर आणि मॉलेड जुल्फी सयैद यांच्यावर महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत. मुलाखत घेण्यासाठी गेली असता कैलास खेर यांनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ट्वीट महिला पत्रकाराने केला आहे. कैलास खेर हे दोन महिलांच्या मध्ये बसले होते आणि चूकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करत होते असे म्हटलं आहे. याच बरोबर महिला फोटोग्राफरने मॉडेल जुल्फीवर जबरदस्ती किस केल्याचा आरोप केला आहे.

 

First Published on: October 7, 2018 1:38 PM
Exit mobile version