इन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती

इन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती

लक्ष्मण मुथैया

इन्स्टाग्राममधील बग शोधल्यामुळे फेसबुकने चेन्नईमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण मुथैया याला ३० हजार डॉलर म्हणजेच २० लाख ६० हजार रुपयांचे बक्षीस दिलं आहे. इन्स्टाग्रामची चूक मुथैयानी लक्षात आणून दिल्यानंतर सुरूवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेक्युरिटी टीमने त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. मुथैयानी असे सांगितलं की, मी कोणाचीही परवानगी न घेता इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करू शकतो.

मुथैयाने त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये असं लिहिलं की, मी इन्स्टाग्रामची चूकी दाखवू दिल्याबाबत मी फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला माहिती दिली. सुरूवातीला ही माहिती कमी असल्यामुळे त्यांना पटवून देणं अशक्य झालं होतं. मग मी अजून माहिती गोळा करून त्यांना पटवून दिलं. यावेळी मला यश मिळालं. त्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम टीमने बगला फिक्स केलं आणि मला ३० हजार डॉलर बक्षीस दिलं.

लक्ष्मण मुथैया याने इन्स्टाग्राममधील बग शोधून त्यांची चूक दाखवली. बगमुळे इन्स्टाग्रामवरील कोणतेही अकाउंट हॅक करणे शक्य होते. मुथैयाने इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या रिकव्हरी कोडद्वारे हॅक करता येते ही चूक शोधली. तसेच कोणत्याही इन्स्टाग्राम अकाउंटवरून पासवर्ड रिसेट, पासवर्ड रिकव्हरी कोडसाठी रिक्वेस्ट पाठवली जाते. यापूर्वी लक्ष्मण मुथैयाने फेसबुकच्या डेटा डिलीशन आणि डेटा डिस्क्लोजर या बगचा शोध घेतला होता.

First Published on: July 19, 2019 5:22 PM
Exit mobile version