लॉकडाऊनमध्ये महिला तयार करत होती पोळ्या आणि झालं असं काही…! बघा, भन्नाट व्हिडीओ

लॉकडाऊनमध्ये महिला तयार करत होती पोळ्या आणि झालं असं काही…! बघा, भन्नाट व्हिडीओ

एखादा पदार्थ बनवणं तसं सहसा सोपं नसतं. त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिली (Chile) येथील सॅन्टियागो (Santiago) येथील अँड्रेस पर्कू अलेग्रीया (Andres Percu Alegria) मध्ये एका महिलेने पदार्थ बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, यावेळी पोळी तयार करताना तिचा प्रयोग फसला. पोळी तयार कशी करायची हे दाखवत असताना अचानक तिच्या चेहऱ्यावर पीठ उडते… याच मजेदार प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लोक या व्हिडीओला खूप पसंती देत आहेत. आतापर्यंत ९ मिलियनहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये ती महिला स्पॅनिशमध्ये बोलताना दिसत आहे. ती प्रथम कणीक मळते आणि नंतर ती कणकेचा गोळा घेऊन पोळ्या लाटण्यास सुरूवात करते. मात्र यावेळी तिचा पदार्थ अर्धवट राहतो. तुम्हीच बघा व्हिडीओमध्ये… हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, ‘रोटी बनवण्याचा नवीन मार्ग.’ त्यानंतर ही महिला रेकॉर्डिंग सुरू करते. मात्र तिची पंचायत झाल्यानंतर रेकॉर्डिंग करणार्‍या व्यक्तीला ती रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगते.

बघा व्हिडीओ

फेसबुकवर या व्हिडीओला खूप पसंती मिळत असून आतापर्यंत ९.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५ लाखांहून अधिक लाइक्स आणि ७६ हजारापेक्षा जास्त कमेंट्स मिळाले आहेत.


मोदी देशाला संबोधित करण्यापुर्वी Lockdown-4 होतोय ट्रेंड, लोकं म्हणताय… ‘मोदीजी टास्कपण द्या, प्लीज!’
First Published on: May 14, 2020 5:28 PM
Exit mobile version