लॉकडाऊन पडले महाग, वजन वाढले दोनशे पार!

लॉकडाऊन पडले महाग, वजन वाढले दोनशे पार!

लॉकडाऊन पडले महाग, वजन वाढले दोनशे पार!

जगभरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला. कोरोना विषाणू उदयास आलेल्या चीनमधील अनेक भागात लॉकडाऊन आहे. चीनमधील वुहानच्या एका तरुणाला लॉकडाऊन चांगलाच महागात पडला आहे. लॉकडाऊन दरम्यान सतत खाऊन या तरुणाचे वजन तब्बल १०० किलो वाढलं आहे.

माहितीनुसार, या तरुणाचं नाव झोऊ असं आहे. तो आधीपासूनचं जाड होता. तो एका सायबर कॅफेत काम करत होता. लॉकडाऊन झाल्यामुळे तो पाच महिने घरी होता. या दरम्यान तो फक्त खायचा जास्त हालचााही करत नव्हता. त्यात तो मद्य देखील प्यायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याचे पाच महिन्यात तब्बल १०० किलो वजन वाढलं आणि एकूण वजन २७७ किलो झालं.

त्याच्या वजनामुळे त्याला हालचाल करणे देखील शक्य होत नव्हते. जेव्हा त्याला छातीत दुखायला लागलं तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये न घेऊन जाता डॉक्टरांचा पाचारण करण्यात आले. डॉक्टरांकडे जाणे त्याला शक्य नव्हतं. डॉक्टर झोऊची अवस्था पाहून आश्चर्यचकीत झाले. शेवटी झोऊला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला आयसीयूमध्ये हलवण्यासाठी सहा सुरक्षा कर्मचारी आणि चार वैद्यकीय अधिकारी लागले. झोऊच्या वजनामुळे या सर्वांची चांगलीच दमछाक झाली. झोऊला वजन वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला होता. झोऊची सध्या प्रकृती स्थिर असून अजूनही उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – काय नशीब आहे राव! काम करताना सापडली अशी वस्तू ज्यामुळे झाला…


 

First Published on: July 1, 2020 11:39 PM
Exit mobile version