video: नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली पत्नी; मोदींकडे केली अजब मागणी

video: नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली पत्नी; मोदींकडे केली अजब मागणी

नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली पत्नी,केली पंतप्रधानांकडे अजब मागणी

करोना व्हायरसने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरासह देशभरात अनेक नागरिकांना करोनाची लागण झाल्याने भारतात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केल्याने सर्वच नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘WORK FROM HOME’ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र नुकताच एक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

या भल्यामोठ्या लॉकडाऊनमुळे लोक न ते रिकामे चाळे करून आपले मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहे. त्यापैकीच एका महिलेने या लॉक डाऊनचा नेमका काय फटका बसतोय ते व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहे. या महिलेने चक्क पंतप्रधानांकडे आपल्या नवऱ्याची तक्रार करत अजबच मागणी केली आहे.

 

 

अशी केली महिलेने पंतप्रधानांकडे मागणी

देश लॉक डाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती घरातून काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर या महिलेने किचन देखील लॉक डाऊन करण्याची मागणी केली आहे. कारण घराची मंडळी घरात असल्याने सतत वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या फर्माईश करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे.

पती वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्याच्या खाण्याच्या मागणीत वाढ होत चालली आहे. दर अर्ध्या तासाने त्याला काही ना काही खाण्यास लागते, यामुळे वैतागलेल्या या पत्नीने थेट मोदींकडे याची तक्रार केली आहे.

असा आहे हा व्हिडीओ

व्हिडीओ करणाऱ्या महिलेने व्हिडीओमध्ये असे म्हटले की, पती दर अर्ध्यातासाने काहीन काही पदार्थ खाण्याची मागणी करतो. यात कधी चिप्स, पकोडे, कधी भात… अनेक तऱ्हेरे पदार्थ त्याला बनवून देण्याची मागणी वाढत असल्याचे या महिलेने या व्हिडीओमध्ये सांगितले. या मागणीमुळे हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे.

First Published on: March 27, 2020 5:16 PM
Exit mobile version