‘आम्ही किती काळ सुरक्षित राहू’ हे माहित नाही: जपानच्या क्रूझवर अडकली मुंबईची सोनाली

‘आम्ही किती काळ सुरक्षित राहू’ हे माहित नाही: जपानच्या क्रूझवर अडकली मुंबईची सोनाली

मुंबईची सोनाली ठक्कर अडकली जपानमध्ये

जपान, चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आता मदतीची मागणी केली जात आहे. मुंबईची सोनाली ठक्कर लक्झरी क्रूझ डायमंड प्रिन्सेस या जहाजामध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण, जर त्या आणखी काही दिवस या जहाजावर राहिल्यास त्यांनाही करोनाची लागणही होऊ शकते, असेही त्यांनी भारत सरकारला सांगितले. चीनपासून सुरू झालेला करोना विषाणू जगभर पसरला आहे. जपानमध्ये एक लक्झरी क्रूझ डायमंड प्रिंसेसला योकाहामा बंदरात ठेवण्यात आलं आहे. या जहाजात एकूण २१९ प्रवासी करोना व्हायरसमुळे संक्रमित आढळले आहेत. ज्यामध्ये दोन भारतीय आहेत.

जहाजावर अडकले १३८ भारतीय – 

जहाजावर क्रू आणि प्रवासी मिळून एकूण १३८ भारतीय आहेत. अशा मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर जपानच्या प्रशासनाने या पूर्ण जहाजाला वेगळं ठेवलं आहे. मुंबईची सोनाली ठक्करही या क्रूझवर अडकली आहे.
क्रूझवर अडकलेल्या भारतीयांनी मोदी सरकारला त्यांना वाचवण्यासाठी मदत मागितली आहे. सुरक्षा रक्षक असलेल्या सोनाली ठक्कर यांना ही ताप आणि इतर लक्षणे आढळले आहेत. त्यामुळे, त्यांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. मुंबईची रहिवासी असलेल्या सोनालीने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, आपण खूप घाबरलो असल्याचं सांगितलं आहे. शिवाय, करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. भारत सरकारने आम्हाला परत आणण्याची सुविधा करावी. शिवाय, भारतातून डॉक्टर्स पाठवावेत जे आम्हाला उपचारांसाठी मदत करु शकतील अशी मागणी ही सोनालीने केली आहे. सोनालीने सोशल मीडियावरुन ही मदत मागितली आहे.

सोनाली या जहाजावरील सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांना बरेच दिवस या जहाजावर ठेवल्यास त्यांनाही करोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे, सरकारने त्यांना आणि जहाजात अडकलेल्या इतर भारतीयांना लवकरात लवकर परत बोलावण्याची व्यवस्था करावी. सोनाली म्हणाली, ‘कृपया त्या लोकांना हा आमचा मेसेज द्या जे आमची मदत करु शकतात. १० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला बाहेर काढा.’.

First Published on: February 14, 2020 5:50 PM
Exit mobile version