धोनी म्हणतो, ‘हा स्टंट नक्की करुन बघा’!

धोनी म्हणतो, ‘हा स्टंट नक्की करुन बघा’!

धोनीने केला असा स्टंट

सध्या #kikichallenge ने सगळ्यांना वेड लावले आहे. असला जीवघेणा प्रकार करु नका हे सांगण्यासाठी देशभरातील पोलिसांनी अभियान सुरु केले असून आता एक नवा स्टंट घेऊन माही म्हणजे एम एस धोनी आला आहे . खरंतर असे काही स्टंट करु नका,असा सेलिब्सकडून नेहमीच सल्ला दिला जातो. पण चक्क महेद्रसिंग धोनी हा स्टंट करा असे म्हणत आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

काय आहे व्हिडिओ?

धोनी सध्या ब्रेकवर आहे आणि लवकरच तो आशिया कप २०१८ साठी पुनरागमन करणार आहे. पण सध्या धोनीच्या या व्हायरल व्हिडिओचाच सगळीकडे बोलबाला आहे. धोनीला दुचाकी गाड्यांचे वेड आहे. हे काही नव्याने सांगायला नको. या व्हिडिओत देखील तो एका सायकलवर स्टंट करताना दिसत आहे. आता हा स्टंट नक्कीच जीवघेणा नाही. कारण हेडफोन घालून तोंडात लाकडी पट्टी घेऊन सायकल चालवतं आहे. मजेशीर असा हा व्हिडिओ असून त्याने ‘फक्त मजेसाठी, तुम्ही पण नक्की करुन पहा ‘, असे म्हटले आहे.

वाचा- #KiKiChallenge सोशल मीडियावरचा नवा बिनडोकपणा!

धोनीचा फिट अंदाज

नुकत्यात इंग्लड येथे झालेल्या टेस्टमॅचमध्ये धोनीच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून लांबच दिसला. पण या काळात तो त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत होता हे नक्की! कारण त्याचे टोन्ड बायसेप आणि फिट अवतार त्याची साक्ष आहे. ३७ वर्षांच्या धोनीवर त्याच्या कामगिरीवरुन टीका होत होती. त्यामुळेच त्याने ब्रेक घेतला होता. आता धोनीचा हा फिट अंदाज पाहता त्याचा कमबॅक दमदार असेल, असेच वाटत आहे.

First Published on: July 31, 2018 8:55 PM
Exit mobile version