‘या’ गोष्टींमुळे तुमच्या कारची होणार नाही चोरी

‘या’ गोष्टींमुळे तुमच्या कारची होणार नाही चोरी

फाईल फोटो

दुचाकी असो अथवा चार चाकी गाड्या चोरी होण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. तेंव्हा खबरदारी म्हणून या गोष्टी करा ज्यामुळे तुमची कार चोरीला जाण्याला आळा बसेल. खुप वेळा आपल्याच निष्काळजी पणा मुळे आपली गाडी चोरीला जाण्याची शक्यता असते. तेंव्हा नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा खबरदारीचा उपाय म्हणून या पाच गोष्टी करा. त्याच बरोबर काळजी घेउन देखील कार चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा संरक्षण विमा काढणे, संपल्यास रिन्यू करणे गरजेचे आहे.

पार्किंग

कोणतीही कार चोरी होणे टाळण्यासाठी सगळ्यात आधी आपण कार पार्कींग करताना काळजी घेतली पाहिजे. एखाद्या ओसाड जागी कार पार्किंग केल्यास चोरीची शक्यता जास्त असते. तेंव्हा वाहनतळातच कार पार्किंग करावी. तसेच गाडीमध्ये शक्यतो मौल्यवान वस्तु ठेवणे टाळावे. बऱ्याच वेळी गाडीत ठेवलेला लॅपटॉप किंवा मोबाईल चोरीसाठी गाडीची काच फोडल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. बॅंकेच्या किेवा रोखीचा व्यवहार करुन आल्यास, तुम्ही दररोज जर स्वता जवळ जास्तीची रोख रक्कम बाळगत आसाल तरी अशी रोख रक्कम आसलेली बॅग गाडीत ठेवुन जाउ नका. तुमच्या मागावर असलेली व्यक्ती यासाठी तुमची कार चोरी करु शकते.

GPS प्रणाली

आता आलेल्या बहुतेक गाडंयामध्ये जीपीएस कार्य प्रणाली आहे. मात्र जुन्या गाड्यांमध्ये तशी सुविधा नाही. मात्र तुम्ही तुमच्या गाडीत जीपीएस यंत्रणा बसवु शकता. त्यामुळे तुमची गाडी चोरीला गेली तरी तुम्ही जीपीएसने गाडीचा शोध घेउ शकता. गाडीत अशा ठिकाणी ही जीपीएस सिस्टीमलावा की चोराचे लक्ष जाणार नाही.

सायरन

गाडी चोरी होण्यापासून बचावण्यासाठी सायरन सिस्टम अतीशय चांगली यंत्रणा आहे. एंटी सिस्टम यंत्रणेमुळे एखाद्या चोराने गाडी उघडण्याचा प्रयत्न केला तर लगेचच मोठ्या आवाजात सायरन वाजायला सुरवात होते, त्यामुळे तुम्ही गाडीच्या जवळपास नसलात तरी सायरनच्या आवाजाने चोर पळुन जाईल.

लॉक अॅसेसरीज

काही अॅसेसरीज वापरुन तुम्ही गाडी सुरक्षित ठेवु शकता. ज्यामध्ये गेर लॉक, गाडीची डिक्की लॉक, स्टेअरिंग लॉक यांसारख्या सिस्टीम तुम्ही गाडीत बसवु शकता. अशा अॅसेसरीजमुळे चोराला गाडीची चोरी करताना लॉक तोडायला किंवा अॅसेसरीज तोडायला वेळ लागतो.

गाडीच्या काचा

खुप वेळा घाई घाईत गाडीच्या काचा लावायला आपण विसरतो आणि मग चोराला चोरीसाठी आयती संधी देतो, खुपवेळा गाडीला चावी तशीच लाउन निघुन जातो, या गोष्टी टाळुन तुम्ही गाडीची चोरी थांबवु शकता.

First Published on: March 29, 2019 4:10 PM
Exit mobile version