Video: PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स, म्हणाला- ‘हाय गर्मी’

Video: PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स, म्हणाला- ‘हाय गर्मी’

Video: PPE किट घालून डॉक्टराने केला भन्नाट डान्स, आणि म्हणाला- 'हाय गर्मी'

सध्या संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. वैद्यकीय कर्मचार्‍यांसह, अनेक भागातील डॉक्टर्स त्यांची काळजी न घेता लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. या कठीण काळात प्रत्येकजण अस्वस्थ आहे, परंतु एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, हे पाहून तुम्ही नक्की तुमच्या समस्या विसरून जाल यासह स्मित हास्य ही आपल्या चेहऱ्यावर उमलेल, हे नक्की.

अनेक डॉक्टर पीपीई किट परिधान करून कोरोना रूग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णालयात तास न् तास घालवतात. यावेळी त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे, परंतु या संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. असे हे खरेखुरे कोरोना योद्धे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अगदी त्यांच्या मनातला संदेश देत आहे.

 

या व्हिडिओमध्ये एक डॉक्टर पीपीई किटमध्ये दिसत असून नोरा फतेही यांच्या ‘गर्मी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘या कठीण काळात आणि अशा उष्णतेमध्येही रुग्णांची सेवा करताना आम्ही कधीही निगेटिव्ह झालो नाही. किती अप्रतिम पोशाख आहे.’ गर्मी या गाण्यावरील हा डान्स आतापर्यंत जवळपास ५ लाखवेळा पाहिला गेला आहे. डॉक्टर रिचा नेगी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. त्यावर त्यांनी वरुण धवन व नोरा फतेही यांच्या गर्मी या गाण्यावर डॉक्टर मनसोक्त नाचताना दिसत आहे. १ जुलैला पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाख ९१ हजार ९१७ वेळा पाहिला गेला आहे.

प्रत्येकास माहितीच आहे की तास न् तास हा पीपीई किट घालणे फार कठीण आहे. यामध्ये केवळ उष्णता निर्माण होतेच, परंतु चेहऱ्यावर मास्क देखील घालावे लागते, त्यामुळे चेहऱ्यावर रॅशेस देखील येतात. असे असूनही सगळ्याच डॉक्टरांची देशसेवेची आवड कमी झालेली नाही.


जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल; एक रात्र राहण्यासाठीचं भाडं ऐकून व्हाल थक्क!
First Published on: July 3, 2020 2:51 PM
Exit mobile version