मास्कमुळे तुमच्याही चष्म्यावर ‘फॉग’ जमतो; मग या डॉक्टरची ट्रीक एकदा वापराच

मास्कमुळे तुमच्याही चष्म्यावर ‘फॉग’ जमतो; मग या डॉक्टरची ट्रीक एकदा वापराच

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात मास्कचा पर्याय योग्य असल्याचे समोर आलेले आहे. मात्र ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी मास्क डोकेदुखी ठरतो. कारण मास्कमुळे चष्म्यावर फॉग जमा होते. ज्यामुळे चष्मा वापणाऱ्या व्यक्तिला पुढचे काही दिसत नाही. चष्म्यांचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांनी तर अँटी फॉग ग्लासेस बाजारात आणले होते. मात्र त्याची किंमत पाहून ग्राहकांनी अशा ग्लासपासून दूरच राहणे पसंत केले होते. आता एका डॉक्टरने मास्क घातला असतानाही फॉग जमू नये, असा जुगाड शोधून काढला आहे. या अनोख्या ट्रीकमुळे तुमच्या चष्म्याच्या लेंसवर फॉगही जमणार नाही आणि तुम्हाला श्वास घ्यायलाही अडचण येणार नाही. सोशल मीडियावर ही ट्रीक सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

डॉक्टर डॅनिअल यांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या जुगाडाबद्दल सविस्तर सांगितले आहे. जर तुमच्याही चष्म्यावर फॉग जमत असेल तर ही ट्रीक वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे. डॉक्टरांचा फोटो नीट पाहिल्यास तुम्हाला दिसून येईल की नाकाच्या वर डॉक्टरने बँडेड लावून हवा जाण्याची जागा बंद केली आहे. या ट्रीकमुळे तुम्ही श्वासातून सोडणारी गरम हवा चष्म्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यामुळे तुमच्या लेंसवर साचणारा फॉग दिसून येत नाही.

 

डॅनिअल यांनी ही ट्रीक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी या ट्विटला लाईक्स आणि रिट्विट मारल्या आहेत. स्वस्तातला जुगाड उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेकांनी डॉक्टरचे आभार देखील मानले आहेत. ही बातमी करेपर्यंत या ट्विटला ७२ हजार लोकांनी रिट्विट केले होते. तर १ लाख ७० हजार लोकांनी लाईक केले होते.

 

First Published on: November 17, 2020 8:35 PM
Exit mobile version