दारूच्या नशेत चालवली बिना टायरची गाडी!

दारूच्या नशेत चालवली बिना टायरची गाडी!

काही लोक वाहन चालवताना वाहतुकीचे नियम ध्यानात ठेवतात. पण काही लोक ते नियम पाळतं देखील नाही. युनायटेड किंगडममध्ये असं काहीस घडलं आहे. युकेच्या पोलिसांनी मद्यपान करतं गाडी चालवणाऱ्याला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या अटक केलेल्या व्यक्तीने मद्यपानाच्या नशेत टायरशिवाय गाडी चालवतं वाहतूक नियम पाळले नाही आहेत. तो इतका नशेत होता की त्याला गाडीला टायर आहे की नाही ते पण कळलं नव्हतं.

शनिवारी रात्री युकेमधील यॉर्कशायर पोलिसांनी ही गाडी जप्त केली. तसंच ड्रायव्हरला देखील अटक करण्यात आली. तसंच यॉर्कशायर पोलिसांनी या गाडीचा फोटो ट्विटरवर शेअर करून लिहिलं आहे की, ‘या चालकानं गाडीचा विमा काढलेला नाही नव्हता. तसंच त्याच्याकडे गाडीचा परवाना देखील नव्हतं.

पुढे पोलिसांनी असं लिहिलं, ‘आज रात्री या गाडीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच चालकांच्या परवानाची आणि विमाची वैधता संपल्याबद्दल आणि कोर्टाशी संबंधित माहिती न दिल्याबद्दल चालकाला अटक करण्यात आली आहे. चालक इतका नशेत होता की त्याला गाडीचे एक टायर हरवल्याचं ठाऊक देखील नव्हतं.’

पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये गाडीचं एक चाक नसल्याचं दिसतं आहे. चाकाशिवाय गाडी चालवणारा हा पहिलाचं व्यक्ती असावा. युकेमध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास शिक्षा म्हणून एक वर्षासाठी वाहन चालवण्यास मनाई आहे आणि दंड म्हणून सहा महिने तुरुंगवास आहे.


हेही वाचा – Video: शेतकऱ्याने गायलं जस्टिन बीबरचं ‘बेबी’ गाणं


 

First Published on: December 17, 2019 3:50 PM
Exit mobile version