व्होडाफोनची सेवा कधीही बंद होण्याची शक्यता; जाणून घ्या कारण

व्होडाफोनची सेवा कधीही बंद होण्याची शक्यता; जाणून घ्या कारण

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा ही सतत सुरु असते. जी कंपनी चांगल्या ऑफर्स देते त्या कंपनीकडे ग्राहकआकर्षित होतात. जियोनं अनेक वेळापासून मोफत कॉलिंगची सूविधा उपलब्ध करून अनेक ग्राहकांना त्यांच्याकडे खेचून घेतले होते. मात्र व्होडाफोन आयडियानं देखील मोफत कॉलिंगची सुविधा त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती पण त्यानंतरही कंपनीला फारसा काही फायदा झालेला नाही. तर दूरसंचार उद्योगाच्या बाजाराला सध्या फारचं आर्थिक दबावाला सामोरं जावं लागतयं. या उद्योगाला अजून एक धक्का सहन करावा लागणार आहे, कारण व्होडाफोनच्या वाढत्या आर्थिक तोट्यामुळे कंपनीची भारताबाहेर जाण्याची चर्चा चालु आहे. एका ऑनलाईन पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार व्होडाफोन ‘पॅक अप करून कोणत्याही दिवशी निघण्यासाठी तयार आहे.’ व्होडाफोन आयडियाच्या संयुक्त कंपनीला नफा होत नाही आहे आणि कंपनी दर महिन्याला लाखों ग्राहक गमावत आहे. या सगळ्या कारणांमुळे कंपनी लवकरच भारतातला व्यवसाय गुंडाळणार आहे.

हेही कळण्यात आलं होतं की व्होडाफओन आयडियाने सावकारांशी कर्ज फेडण्याबाबत काही चर्चा केल्या पण बुधवारी कंपनीने या गोष्टीला नकार दिला आणि हे अहवाल निराधक असल्सांयाचं सांगितलं. हे देखील सांगितले की त्यांची स्थिती सगळे कर्ज वेळेवर फेडण्याइतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अ‍ॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू’ (एजीआर) प्रमाणे घेतलेल्या निर्णयामुळे व्होडाफोनचा मार्ग आणखी कठीण झाला आहे, कारण व्होडाफोन आयडियावर हजारो कोटी रुपयांचा कर भरण्याचे संकट समोर आले आहे. या निर्णयावर विचार करत गरज वाटल्यास कायदेशीर मदत घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. तरी, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की एजीआर प्रकरणात कोणताही खटला चालणार नाही.

First Published on: October 31, 2019 7:06 PM
Exit mobile version