लखनऊमध्ये इको-फ्रेंडली बकरी ईद साजरी

लखनऊमध्ये इको-फ्रेंडली बकरी ईद साजरी

बकरी ईद निमित्ताने केक

बकरी ईद संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे. बकऱ्याचा बळी देऊन ही ईद साजरी करण्यात येते. त्यासाठी गेले महिनाभर मुस्लीम बांधव तयारी करत असतात. मात्र अशा तऱ्हेने एखाद्या प्राण्याचा बळी देणं हा वादाचा मुद्दा झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये इको – फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. बकरी ईद साजरी करण्यासाठी लखनऊमध्ये काही मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं बकरी ईद साजरी करण्यापेक्षा केकवर बकऱ्याचा फोटो लावून प्रातिनिधिक पद्धतीनं बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारचे ईद साजरी केली आहे.

बेकरीच्या मालकानं केलं आवाहन

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका बेकरीच्या मालकानं प्राण्याचा बळी देणं योग्य वाटत नसल्यामुळं यावर्षीपासून बकरी ईद अशा तऱ्हेनं प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. इतकंच नाही तर, नुकतंच अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झाल्यामुळं ही ईद साधेपणानं साजरी करावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.

काही लोकांनी केला विरोध

यासंदर्भातील काही ट्विट प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला विरोध केलेला दिसून येत आहे. त्यामुळं बकरी ईद साजरी करावी की नाही? यावर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचं लखनऊमध्ये दिसून येत आहे.

First Published on: August 22, 2018 1:14 PM
Exit mobile version