आऊटेजनंतर facebook, WhatsApp, instagram सेवा पूर्ववत

आऊटेजनंतर facebook, WhatsApp, instagram सेवा पूर्ववत

आऊटेजनंतर facebook, WhatsApp, instagram सेवा पूर्ववत

Facebook, Instagram आणि WhatsApp सेवा गुरुवारी रात्री ठप्प झाली होती. तसेच शुक्रवारी (आज) सकाळपर्यंत युजर्सला Facebook, Instagram आणि WhatsApp अकाउंट ओपन करताना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे तिन्ही माध्यामांमध्ये फोटो शेअरिंग, व्हिडिओ शेअरिंग आणि इंस्टंट मॅसेज सेवांचा वापर युजर्सला करता येत नव्हता. अनेक युजर्सने आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. परंतु आता आऊटेजनंतर Facebook, Instagram आणि WhatsApp या सेवा पून्हा पूर्ववत झाल्या आहे.

Facebook, Instagram ओपन करताना येत होता ‘हा’ मॅसेज

Facebook च्या मालकीच्या असलेल्या Instagram आणि WhatsApp सेवा बंद होण्याची ही एका महिन्यातली दुसरी वेळ आहे. अनेक युजर्सला Facebook ओपन केल्यानंतर ‘Sorry, something went wrong’ और the pages weren’t available असे मॅसेज येत होते. तर Instagram युजर्सला “We’re sorry, but something went wrong. Please try again,” असे मॅसेज येत होता. यावरून जगभरात अनेक वापरकर्त्यांनी भन्नाट, मजेशीर मीम्स शेअर करत मज्जा घेतली. Downdetector या वेबसाईटच्या माहितीनुसार WhatsApp web रात्री २ वाजल्यापासून ते सकाळी ४ वाजेपर्यंत डाऊन होते. यामुळे अनेक युजर्सला Facebook, Instagram आणि WhatsApp ओपन करण्याचे एक्सेस येत नव्हता.

Facebook चे स्पष्टीकरण

आऊटेजनंतर Facebook कंपनीने अधिकृत माहिती जाहीर केली आहे. यावर फेसबुक प्रवक्ता बोलताना म्हणाला की, ‘कॉन्फिगरेशन मध्ये बदल झाल्याने काही युजर्सला फेसबुक सेवेचा वापर करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आम्ही तात्काळ या सर्व माहितीचा आढावा घेत ही अडचणी दुर केल्या आहेत. Downdetector या वेबसाईटनुसार, गुरुवारी Facebook वापरकर्त्यांमध्ये १५४,१०० हून अधिक युजर्सचे अकाउंट आऊटज झाले होते. ८०,२०० Instagram युजर्स अकाउंट तर १,३०० WhatsApp युजर्स अकाउंट आऊटेज झाले होते. त्यामुळे जगभरातून Facebook, Instagram आणि WhatsApp या तिन्ही माध्यमांतील हजारो लोकांना या आउटेजचा सामना करावा लागला.

यापूर्वीही झाले होते Apps डाऊन

या आउटरेजमध्ये सर्वाधिक अडचणी फेसबुक वापरकर्त्यांना आली. यानंतर इंस्टाग्राम आणि व्हॉटस्अप युजर्सचा नंबर लागतो. यापूर्वीही जगभरात ४२ मिनिटे Facebook, Instagram आणि WhatsApp या सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक युजर्सला फटका बसला. २० मार्चला रात्री ११.०५ मिनिटांपासून ते रात्री ११.४७ वाजेपर्यंत या तिन्ही सेवा ठप्प होत्या. यावरून देखील युजर्सने ट्विटवरून आपली नाराजी व्यक्त केली होती तर काही युजर्सने भन्नाट ट्विट करत आनंद घेतला.


 

 

First Published on: April 9, 2021 10:07 AM
Exit mobile version