अखेर रजनीकांत #MeToo चळवळीबद्दल बोलले

अखेर रजनीकांत #MeToo चळवळीबद्दल बोलले

सध्या भारतात #MeToo चळवळ मोठी होताना पहायला मिळत आहे. दररोज नव्या लोकांवर आरोप होत आहेत, त्याचबरोबर रोज नवे लोक या चळवळीला त्यांचा पाठिंबा दर्शवताना पहायला मिळत आहेत. तर अनेकांनी या चळवळीवर टिकादेखील केली आहे. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील #MeToo चळवळीबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे. रजनीकांत यावर म्हणाले की, #MeToo ही मोहिम चांगली आहे, परंतु महिलांनी त्याचा गैरफायदा घ्यायला नको. या चळवळीमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडत आहेत ही बाब निश्चितच चांगली आहे. मात्र या मोहिमेचा गैरफायदा कोणीही घ्यायला नको. ज्या महिला आरोप करत आहेत त्यांनी पोलीस ठाणअयात तक्रार करावी, असा सल्लादेखील रजनीकांत यांनी दिला आहे.

कधी करणार पक्षाची स्थापना

गेल्या कित्येक महिन्यांपासून रजनीकांत स्वतःचा पक्ष काढणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रजनीकांत यांनीदेखील या बातमीला अनेकदा दुजोरा दिला आहे. परंतु पक्षाची स्थापना कधी होणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. रजनीकांत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी पक्षाची स्थापना करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर रजनीकांत म्हणाले की, या सगळया अफवा आहेत. माझ्या पक्षाचे नाव आणि स्थापनेची तारीख मी लवकरच जाहीर करेन.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता अमेरिकेहून परतली. त्यानंतर तिने माध्यमांशी बोलताना अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला. दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. आहे तिने तिच्यावर उद्भवलेला प्रसंग जगासमोर मांडला. तिच्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. त्या व्यथा मांडताना त्यांनी #MeToo मोहिमेचा आधार घेतला. त्यामुळे भारतात ही मोहीम सुरू झाली आहे.

First Published on: October 20, 2018 8:13 PM
Exit mobile version