उद्या आहे चंद्रग्रहण; ‘हे’ खाणं टाळा

उद्या आहे चंद्रग्रहण; ‘हे’ खाणं टाळा

उद्या आहे चंद्रग्रहण; 'हे' खाणं टाळा

१० ते ११ जानेवारीच्या रात्री चंद्रग्रहण असून हे चंद्रग्रहण पूर्ण नाही आहे. बरेच ज्योतिषी या चंद्रग्रहणाला मानण्यास तयार नाही आहेत. कारण या काळात खगोलीय घटना पूर्णपणे होणार नाही आहे. हे पूर्णपणे होने हे चंद्रग्रहणासाठी खूप आवश्यक आहे. मात्र चंद्रग्रहणाच्यावेळी आपण काय खाऊ नये आणि काय करू नये हे माहित असणं फार महत्त्वाचं आहे.

धान्यापासून तयार झालेले पदार्थ देऊ नये

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दरम्यान खाण्यपिण्याच्या श्रद्धा या सारख्या आहेत. असं बोललं जात की ग्रहणाच्या वेळी काहीही खाऊ नये. परंतु जर आपल्या घरात लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर आपण त्यांना खाण्यासाठी देऊ शकता. फळे, दूध आणि सुका मेवा तुम्ही देऊ शकता. मात्र धान्यापासून तयार झालेले पदार्थ देऊ शकत नाही. उदा, पोळी, भात किंवा डाळ इत्यादी.

ग्रहणाच्या ९ तासांपूर्वी जेवू नये

या चंद्रग्रहणाचा विशेष परिणाम होणार नसल्याचं ज्योतिषांचं म्हणणं आहे. हे ग्रहण रात्री १०:३८ मिनिटांपासून ते २:४८ पर्यंत आहे. सहसा यावेळेच्या अगोदरच जेवलं जातं तर काही लोक झोपतात. ग्रहणाच्या वेळे अगोदर जेवू नये कारण असं म्हटलं जातं की, ग्रहणाच्या ९ तासांपूर्वी तयार केलेलं खाल्लं जातं नाही. कारण ग्रहणांतले वातावरणात हे दुषित असतं.

जेवणात घाला तुळशीचं पान

रोजच्या व्यस्ततेमुळे बऱ्याचदा रात्रीचं सकाळसाठी जेवणं तयार करून ठेवलं जातं. जर तुम्ही असं करत असाल तर त्यामध्ये तुळशी पानं घाला. तुळशीची पानं ही सूर्य मावळण्या अगोदरचं तोडली पाहिजे. सूर्य मावळ्यानंतर तुळशीच्या पानांना हात लावू नये. ग्रहणाच्या दरम्यान जेवलं तर तो माणूस आजारी पडतो असं म्हटलं जातं. तसंच दुसऱ्यांनी दिलेलं जेवणं जेवलं तर अनेक जन्माचं पुण्य नष्ट होत, असं ज्योतिषीचं मतं आहे.


हेही वाचा – २८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत्य करून जादूटोणा; भोंदूबाबाला अटक


 

First Published on: January 9, 2020 10:11 PM
Exit mobile version