गर्लफ्रेंड पटवण्याच्या ‘या’ खास टिप्स तुम्हाला माहितीयत का?

गर्लफ्रेंड पटवण्याच्या ‘या’ खास टिप्स तुम्हाला माहितीयत का?

सध्या मुलगी पटवणं ही एक फॅशन झाली आहे. काय तुला गर्लफ्रेंड नाही? हे वाक्य तरूणांच्या ग्रुपमध्ये हमखास ऐकायला मिळतं. पण गर्लफ्रेंड असणं ही एक खर्चीक गोष्ट आहे असं अनेक मुलांच मत आहे. तुम्हालाही गर्लफ्रेंड नाही आणि एकही रूपया खर्च न करता तुम्हाला गर्लफ्रेंड पटवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हल्ली शाळेपासूनच मुलांचं स्वप्न असतं,आपल्याला एक सुंदर गर्लफ्रेंड असावी. यासाठी मुलींवर चुकीचं इंप्रेशन पडू नये म्हणून ते नेहमी सतर्क असतात. पण कायम मुलांना एक चिंता सतावते ती म्हणजे आपल्याजवळ पैसे नसतील तर आपल्याला गर्लफ्रेंड मिळणं कठीण आहे. पण मुलांचा हा गैरसमज आहे. पण मुलांनो तुम्ही या काही सोप्या टिप्स फॉलो केलात तर तुमची नक्की एक सुंदर मुलगी गर्लफ्रेंड होऊ शकते.

अशी पटवा गर्लफ्रेंड

विनोदबुध्दी – मुलांची विनोदबुध्दी (सेन्स ऑफ ह्युमर) मुलींना प्रचंड आवडू शकते. कोणत्या महागड्या गिफ्टने नाही तर तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही मुलीला खुश करू शकता. असे कपल खूप समजूतदार असतात.

मुलींशी डोळ्यातून संवाद साधा – जर तुम्हाला एखाद्या मुलीला पटवायचे असेल तर तुम्ही तिच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. एखाद्यावेळी शब्द जे काम करत नाही ते काम डोळे करतात. तुमच्या बोलक्या डोळ्यांमधून ती तुम्हाला काय बोलायचे आहे हे ओळखू शकेल.

तुमच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष द्या– केवळ पैशावर नाही तर मुली मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर देखील भाळता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या राहणीमानावर, व्यक्तीमत्त्व सुधारण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्याबरोबर तुमचा ड्रेसींगसेन्सही बदलला पाहिजे. नवीन सुरू असलेला ट्रेण्ड तुम्ही सतत फॉलो करायला हवा. मग बघाच मुली तुमच्या कशा मागे येतील.

पैशापेक्षा प्रेम महत्त्वाचं – मुलं कायम विचार करतात की मुली केवळ पैशावर प्रेम करतात. पण हे शंभर टक्के खरं नाहीये. पण खूप मुली अशा आहेत ज्यांना मुलांकडून पैसे नाहीत तर केवळ प्रेमाची अपेक्षा असते. मुलींना आयुष्यात अशा मुलांची गरज असते जी मुलं आपल्या आयुष्यातील एकटेपणा दूर करेल. प्रत्येक सुख, दुखात त्यांची साथ देईल.

 

गमतीजमती- मुलींना अशी मुलं खूप आवडतात जी कायम हसत खेळत राहतात. त्यामुळे तुम्ही खूप सिरीयस रहात असाल,तर ताबडतोब ही सवय सोडून द्या. तुम्हीपण तुमच्या पार्टनरला कायम हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करा.

काळजीकरणारा बॉयफ्रेंड – मुलींना अशी मुली आवडतात जी मुलं छोट्या छोट्या गोष्टीत मुलीची काळजी घेतील. आता हे गोष्ट तुम्ही एक रूपया खर्च न करताही करू शकता. काळजी घेणारी मुलांकडे मुली आकर्षित होतात. ही मुलं मुलींना खूष ठेवण्यात नेहमी यशस्वी होतात.

या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर हमखास तुम्हाला गर्लफ्रेंड पटू शकते.

First Published on: June 7, 2019 1:01 PM
Exit mobile version