उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांचे खास डुडल!

उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांचे खास डुडल!

(फोटो सौजन्य : Wikipedia)

सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गुगलने एक विशेष डुडल तयार केलं आहे. या डुडलमध्ये लेखिका इस्मत चुगताई या लेखन करतानाचे चित्र साकारण्यात आले आहे. गुगलने हे डुडल तयार करुन चुगताई यांना आदरांजली वाहिली आहे.

चुगताई यांच्याविषयी…

आपल्या लेखणीतून समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या म्हणून चुगताई यांची ओळख आहे. २१ ऑगस्ट १९१५ रोजी उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे त्यांचा जन्म झाला. चुगताई नेहमीच महिलांच्या समस्यांना वाचा फोडायच्या. तर विशेषत: मुस्लिम समाजातल्या मुलींचे प्रश्न त्यांच्यावर होणारे अत्याचार त्या आपल्या साहित्यातून समाजासमोर आणायच्या. तसेच त्यांनी त्या काळात समलैंगिकतेसारखा विषय चुगताई यांनी आपल्या कथेतून लोकांच्या समोर आणला. चुगताई यांचे २४ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झाले.

चुगताई यांनी लिहिल्या चित्रपटाच्या पटकथा

चुगताई लेखणीसहित चित्रपटाच्या पटकथेसह अभिनय देखील करायच्या. त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. ‘जुगून’ या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला होता. तसेच ‘लिहाफ’ ही १९४२ मधील त्यांची कथा चांगलीच गाजली होती. त्याचबरोबर १९७३ मधील ‘गर्म हवा’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला असून या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

पाहा : ‘गुगल’ची खास इंडियन डुडल्स!

First Published on: August 21, 2018 1:22 PM
Exit mobile version