राजा राममोहन रॉय यांना गुगल ‘डुडल’ची आदरांजली

राजा राममोहन रॉय यांना गुगल ‘डुडल’ची आदरांजली

गुगलची डुडलद्वारे राजा राममोहन रॉय यांना आदरांजली

बालविवाह, सतीसारख्या अमानुष प्रथेच्या जोखडातून भारतीय स्त्रीला मुक्त करणारे राजा राममोहन रॉय यांची २४६वी जयंती. त्याचेच औचित्य साधत गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशात उदारमतवादी आणि आधुनिक धोरणांचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती राजा राममोहन रॉय यांनी.

त्यांच्या कार्याविषयी थोडंसं…

२२ मे १७७२ रोजी राजा राममोहन रॉय यांचा जन्म पंश्चिम बंगालमधल्या राधानगरी या गावचा.त्यांचा बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अभ्यास घरीच झाला. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधल्या पाटणा येथे अरबी आणि फार्सीच्या शिक्षणासाठी गेले. यानंतर राजा राम मोहन रॉय यांनी स्मृती, पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा अभ्यास केला. २० ऑगस्ट १८२८ रोजी त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. यानंतर त्यांनी भारतीय स्त्रीयांच्या दयनीय स्थितीबद्दल आवाज उठवला. त्यामधील एक प्रथा म्हणजे सती. जिथे कुठे स्त्री सती जात असेल त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला त्यापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करत. त्यामुळे समाज त्यांना हिंदू विरोधी ठरवू लागला. सती प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे कायदेशीर अर्ज केला. शिवाय याचा पाठपुरावा देखील चालू ठेवला. त्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले.यावर खुश होऊन दिल्लीच्या बादशाहाने त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. समाजातील अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. अशा या समाजद्रष्ट्याचा २७ डिसेंबर १९३३ रोजी निधन झाले.

स्त्रीयांची आजची सामाजिक स्थिती

भारतात आज स्त्रिया अनेक क्षेत्रात पुढे आहेत.इतरही समाज सुधाकरांप्रमाणे राजा राममोहन रॉय यांचा देखील यात महत्त्वाचा हिस्सा आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला माय महानगरचा सलाम!

First Published on: May 22, 2018 10:08 AM
Exit mobile version