Google Maps वापरणं पडलं महागात! गुगलच्या ‘त्या’ एका चुकीने तरूणाचा मृत्यू

Google Maps वापरणं पडलं महागात! गुगलच्या ‘त्या’ एका चुकीने तरूणाचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

एखाद्या नव्या ठिकाणी प्रवास करायचा असेल आणि त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर आपल्याला माहित नसेल तर बरेच जण गुगल मॅप्सचा वापर करतात. गुगल मॅप्सच्या मदतीने एखादा नवा पत्ता शोधणं सहज शक्य होते. या तंत्रज्ञानाच्या युगात हे तंत्रज्ञान वापरणं जरी सोयिस्कर असलं तरी गुगल मॅप्सचा वापर करणं एक तरुणाच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. गुगलच्या एका चुकीमुळे तरूणाला आपले प्राण गमावण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाच्या सायबेरियामध्ये राहणाऱ्या तरुणाला गुगलने चुकीचा रस्ता दाखवला आणि यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

असा घडला प्रकार

वयवर्ष १८ असणारा तरूण आपल्या एका मित्रासोबत बाहेर गेला होता. त्याने गुगल मॅप्सची रस्ता शोधण्यासाठी मदत घेतली. मात्र गुगलने त्याला चुकीचा रस्ता दाखवला आणि तो चुकीच्या ठिकाणी पोहोचला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. रशियातील सर्गे उस्तीनोव आणि वाल्दील्साव इस्तोमिन हे दोघे सायबेरियातील पोर्ट ऑफ मॅगेडन या भागात जात होते. हा थंड प्रदेश असून त्यासाठी त्यांनी गुगल मॅप्सची मदत घेतली पण गुगल मॅप्सने केलेली एक चूक त्यांना महाग पडली. गुगल मॅप्सच्या एका चुकीमुळे हे दोघेही चुकून रोड ऑफ बोन्स या ठिकाणी पोहचले.

ज्या भागात हे तरूण पोहोचले तो भाग धक्कादायक समजला जातो. या भागात रात्री तापमानात मोठी घट आणि याठिकाणीच गुगल मॅप्सने शॉर्टकट दाखवण्याच्या नादात त्या दोघांना धोकादायक जागाचा मार्ग दाखवला. हा मार्ग अवघड असून पूर्णपणे बर्फाच्छादीत होता. तेथे तापमानात मोठी घट झाल्याने थंडीने एका तरूणाचा याठिकाणी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मार्गावर सर्गे याचा मृत्यू झाला, त्या मार्गाला ‘मृत्यूचा मार्ग’ म्हटलं जातं. या रस्त्याच्या निर्मिती सोव्हिएत युनियनच्या काळात स्टॅलिनने केली होती. तरुणांना येथील वातावरणाबद्दल माहिती नव्हती. तसेच दुसऱ्या तरुणाची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे.


सुपरहिट ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

First Published on: December 12, 2020 3:49 PM
Exit mobile version