Google Mapने घातला घोळ,वऱ्हाड्यांसह नवरदेव पोहचला दुसऱ्याच लग्नमंडपात

Google Mapने घातला घोळ,वऱ्हाड्यांसह नवरदेव पोहचला दुसऱ्याच लग्नमंडपात

Google Mapने घातला घोळ,वऱ्हाड्यांसह नवरदेव पोहचला दुसऱ्याच लग्नमंडपात

लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग आहे. प्रत्येकजण आपल्या लग्नासाठी उत्साही असतो. मात्र नवऱ्या मुलासोबत झालेला एक प्रकार पाहून सर्वांनाच हसू येईल. लग्नाच्या दिवशी नवरदेव वऱ्हाडीमंडळीसोबत लग्नमंडपात पोहचला. लग्नमंडपात सगळे जमले. मुलीकडच्यांनीही मुलांचे आणि वऱ्हाड्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. लग्नाच्या सर्व विधी सुरु झाल्या. लग्न लागणार तोच धक्कादायक प्रकार सर्वांच्या समोर आला. कारण नवरा त्याचा लग्नमंडप सोडून दुसऱ्याच लग्नमंडपात आला होता. मुलासोबतच मुलीकडच्याही सर्व मंडळींची झोप उडाली.

ट्रिब्यून न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशिया येथील आहे. तिथे लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुलाकडची मंडळी गुगल मॅपचा वापर करुन लग्नमंडपात पोहचण्यासाठी निघाली. लग्नमंडपात पोहचण्यासाठी मुलाकडच्यांनी घेतलेल्या गुगल मॅपने नवऱ्यामुलाचा आणि वऱ्हाड्यांचा चांगलाच फज्जा उडवला. इंटरनेटमुळे आपलं आयुष्य सोपे झाले आहे. मात्र त्यामुळे काही विचित्र प्रसंगानाही आपल्याला समोरे जाव लागते. वाटेत गुगल मॅपने घोळ केला आणि वऱ्हाड्यांना चुकीच्या लग्नमंडपात आणून सोडले.

नवरदेव चुकीच्या लग्नमंडपात पोहचला हे मुलींकडील मंडळींच्याही लक्षाच आले नाही कारण त्या लग्नमंडपातील नवऱ्याला येण्यास उशिर झाला होता. त्यामुळे त्यांचीही हे वऱ्हाड आपलेच असल्याची समजूत झाली. त्याप्रमाणे त्यांनीही मुलाकडच्याचा पाहुणचार करालया सुरुवाच केली. मात्र लग्न लागण्याच्या वेळेस नवरी मुलीच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या जागी दुसराच माणूस पाहून तिही चक्रावून गेली. सर्व प्रकार लक्षात आल्यावर मुलाकडच्या मंडळींनी मुलीकडच्या मंडळींची माफी मागितली.


हेही वाचा – SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ९३ जागांसाठी भरती

First Published on: April 15, 2021 10:50 PM
Exit mobile version