गुगल झाले २१ वर्षांचे; स्वतःसाठी तयार केले खास डूडल!

गुगल झाले २१ वर्षांचे; स्वतःसाठी तयार केले खास डूडल!

आज गुगलचा २१ वा वाढदिवस आहे. गुगलच्या या प्रवासाला २७ सप्टेंबर १९९८ रोजी सुरूवात झाली होती. याच दिनाचे औचित्य साधत गुगलने एक खास डूडल साकारले आहे. गुगल हे सर्च इंजिन नेहमीच महान व्यक्तिमत्व तसेच काही महत्वाच्या घटनांची आठवण करून देण्याकरिता गुगल हे सर्च इंजिन विशेष डूडल बनवत त्यांना मानवंदना देत असते. मात्र, आज गुगलने स्वतःचा २१ वा वाढदिवस साजरा करताना स्वतःकरिता आकर्षक डूडल सादर केले आहे.

असे आहे आजचे डूडल

गुगलच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त डूडल साकारताना १९९८ च्या जुन्या संगणकाला दाखवण्यात आले आहे. यामध्ये जुन्या गुगलचे होमपेज ओपन असल्याचे दिसत असून या डूडलमध्ये गुगलचा लोगो देखील दाखवण्यात आला आहे. यासोबत गुगलचा २० वर्षाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

१९९८ मध्ये स्टैन फोर्ड विद्यापीठातील पीएचडीच्या दोन विद्यार्थ्यांनी तयार केले होते. लैरी पेज आणि सर्जी ब्रिन असे त्यांची नावे असून जगभरात वापरलं जाणारं सर्च इंजिन तयार करण्याची कल्पना या दोघांची होती. यावंर त्यांनी एक पेपरही पब्लिश केला होता. आज गुगल इंटरनेटवरील सर्वात मोठं सर्च इंजिन मानलं जात असून जगभरात गुगल १०० भाषांमध्ये कार्यरत आहे. गुगल आपल्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांचे उत्तरं देत असतो.. त्यामुळे अशा मार्गदर्शक ठरणाऱ्या गुगलला आज २१व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

First Published on: September 27, 2019 9:01 AM
Exit mobile version