…आणि बघितले तर दिसली लांब-लचक मगर

…आणि बघितले तर दिसली लांब-लचक मगर

गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. ही घटना समजल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. महेंद्र पढिय़ार असे नाव असणारा व्यक्ती मंगळवारी रात्रीच्यावेळी आपल्या घरी शांत झोपले होते. यावेळी या व्यक्तीच्या घरातून मध्यरात्री विचित्र आवाज ऐकू येत होता. हा आवाज ऐकल्यानंतर त्याने घराबाहेरून कसला तरी आवाज येत असेल, असे समजून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र हा आवाज मोठ्याने येऊ लागला तेव्हा महेंद्र हे घरातील बाथरूमच्या दिशेने गेले. यानंतर जो आवाज बाथरूममधून आला त्यानंतर त्यांती झोप उडाली.

अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश

हा आवाज आल्यानंतर त्यांना असे वाटले की, त्यांच्या बाथरूममध्ये मांजर असेल. मात्र बाथरूमचे दार उघडल्यावर त्यांनी बघितले तेव्हा लांब-लचक मोठी मगर तोंड उघडून बसली होती, असे मगरीचे दृश्य बघून महेंद्र थक्क होऊन त्यांचा श्वास थांबला. या प्रकारानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी वाईल्डलाईफ रेस्क्यू ट्रस्ट (वन्यजीव बचाव ट्रस्ट) शी संपर्क साधला. या फोननंतर पावणे तीन वाजेदरम्यान रेस्क्यू ट्रस्टची टीम त्यांच्या घरात पोहोचली. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर या मगरीला पकडण्यात यश आले.

साडेचार फूट लांबीची मगर

ही मगर साधारण साडेचार फूट लांबीची होती. महेंद्र यांच्या घरातील बाथरूममध्ये ज्या ठिकाणी ही मगर होती. तेथे खूप अंधार त्यामुळे या मगरीला पकडणे अशक्य होते, तसेच महेंद्र यांचे घर हे विश्वमित्री नदी पत्राच्या जवळ असल्याने त्याच्या घरात ही मगर घुसली असावी, असे वाइल्डलाइफ रेस्क्यू ट्रस्टच्या अरविंद पवार यांनी सांगितले. गुजरातच्या वडोदरामध्ये घरात मगर घुसण्याच्या घटना सामान्य आहे. विश्वमित्री नदीत अनेक मगरींचे साम्राज्य असते, असे देखील सांगण्यात येत आहे.

First Published on: November 6, 2019 8:14 PM
Exit mobile version