हाती लिहीला नोकरीचा अर्ज, बदलून गेले त्याचे नशीब

हाती लिहीला नोकरीचा अर्ज, बदलून गेले त्याचे नशीब

प्रातिनिधिक फोटो

परिस्थितीला कधी कुणाला काय करायला लावेल हे सांगती येत नाही. मात्र, दुसरीकडे याच परिस्थितीमुळे तुमचं नशीब कधी पलटेल याचाही नेम नाही. काहीसं असंच घडलंय अर्जेंटिनाच्या एका २१ वर्षीय तरुणासोबत. कार्लोस डुओर्ट या तरुणाची आर्थिक तितकीशी चांगली नाही. नोकरीच्या अर्जाची प्रिंट काढण्यासाठी देखील कार्लोसकडे पैसै नव्हते. त्यामुळे एका कॉफी शॉपमध्ये नोकरीसाठी द्यायचा अर्ज त्याने चक्क हातानेच लिहीला. प्रिंट आऊटसाठी पैसे नसल्याने त्याला हे पाऊल उचलावे लागले. इतकंच नाही तर एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, नोकरी शोधण्यासाठी ठिकठकाणी फिरणे गरजेचे असल्यामुळे या प्रवासाचे पैसैही त्याने आपल्या आजीकडून घेतले. नोकरी शोधत फिरत असताना कार्लोसला एक कॉफी शॉप दिसले. त्या कॉफी शॉपमध्ये नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने काही काळ तो शॉपबाहेर टेहळत राहिला. दरम्यान कॉफी शॉपमध्ये काम करणारी एका महिलेने शॉपच्या बाहेर येऊन त्याच्याकडे चौकशी केली. कार्लोसने नोकरीसाठी विचारताच त्या महिलेने त्याला सध्या तरी शॉपमध्ये नोकरी नसल्याचे सांगितले. मात्र, ‘भविष्यात नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते त्यासाठी तू अर्ज (रिझ्युम) देऊन ठेव’, असं त्या महिलेने कार्लोसला सांगितले.

शार्लोकने हाती लिहीलेला नोकरीचा अर्ज

सुरुवातीला यामुळे खुष कार्लोस खुष तर झाला पण तयार रिझ्युमेची प्रिंट काढण्यापुरतेही त्याच्या खिशात पैसे नव्हते. मात्र, कार्लोसने जिद्द न हरता तातडीने त्या महिला कर्मचाऱ्याकडे पेन आणि पेपरची मागणी केली आणि हातानेच नोकरीचा अर्ज लिहून दिला. विशेष म्हणजे अर्ज लिहीतेवेळी त्यांनी प्रोफेशनली २ वेगवेगळ्या पेनांचा वापर केला. ती महिला हा अर्ज पाहून इंप्रेस झाली आणि तातडीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्या अर्जाचा एक फोटो शेअर केला. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हायरल झाली की कार्लोसला नोकरीसाठी अनेक ठिकाणाहून कॉल यायला सुरुवात झाली. जगभरातील असंख्य लोकांकडून शार्लोकच्या नोकरी मिळवण्यासाठीच्या धडपडीचे कौतुकही करण्यात आले. दरम्यान या सर्व प्रतिक्रियांवर रिप्लाय करत कार्लोसने सगळ्यांचेच मनापासून आभार मानले. दरम्यान शार्लोक सध्या एका काचेच्या कंपनीमध्ये नोकरीला लागल्याचे वृत्त सीएनएनने जाहीर केले आहे.


वाचा : फिटनेस बॅण्ड आता रिस्ट वॉचच्या रुपात

First Published on: September 28, 2018 4:12 PM
Exit mobile version