नेटफ्लिक्स, अॅमेझॉनमुळे ‘त्याने’ गमावली नोकरी

नेटफ्लिक्स, अॅमेझॉनमुळे ‘त्याने’ गमावली नोकरी

खुशखबर! आता NETFLIX वर दर आठवड्याला पहा नवीन सिनेमे

नेटफ्लिक्स, अॅमेझॉनवर येणाऱ्या व्हिडीओ सतत पाहिल्यामुळे एका तरुणाला आपली नोकरी गमवावी लागली आहे. गेल्या दिड महिन्यांपासून या मुलावर सध्या एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. ऑफिसमध्ये सतत कामाच्या वेळेस, घरी, कुठेही, कधीही ३० वर्षीय सत्यवान शिर्के ( नाव बदललेले) हा तरुण मोबाईलमध्ये नेटफ्लिक्स त्यासोबतच अॅमेझॉनवरील येणारे नवनवीन व्हिडीओ पाहत राहायचा. पण, आयटी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या सत्यवानला या सवयीमुळे एके दिवशी आपली नोकरी गमवावी लागली आहे. या तरुणाच्या आयुष्यावरच नेटफ्लिक्सने ताबा मिळवला आहे.

तरुणाई नेटफ्लिक्समुळे व्यसनाधीन

इंटरनेट आणि त्यापासून मिळणाऱ्या सुविधांचा हल्लीच्या तरुणांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. त्यातूनच तरुणमंडळी कायम आणि तासंतास मोबाईलवर राहतात. त्याचा परिणाम सर्वात जास्त त्यांच्या मनावर होतो. शिवाय, सर्वच गोष्टींना बाजूला सारुन फक्त ही मंडळी मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. अशा तरुणांमध्ये नेटफ्लिक्समुळे येणाऱ्या व्यसनाधीनतेचा परिणाम अत्यंत गंभीर टप्प्यावर होतो आणि त्यांना वास्तवाचे भानही उरत नाही.


वाचा – ब्लू व्हेल गेमचा आणखी एक बळी; नागपुरात १७ वर्षीय मुलीची आत्महत्या


मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण ऑफिसमध्ये ही सतत नेटफ्लिक्सवर असायचा. ऑफिसच्या मिटींगमध्ये ही सतत मोबाईलमध्ये असायचा. ज्याच्यामुळे त्याला इंजिनिअरींगची नोकरी गमवावी लागली. शिवाय, त्याचं वैवाहिक जीवन ही पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्याची पत्नीही सतत त्याच्या अशा वागण्यामुळे तक्रारी करत असते. त्याच्यावर गेले दिड महिने मानिसक उपचार सुरू आहेत. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन या दोन्ही वेबसिरीजवर व्हिडीओ अगदी सहज उपलब्ध होतात. शिवाय, कुठलाच ब्रेक न घेता यावर सिरीज बघितल्या जाऊ शकतात. त्यामुळे, एकदा डाऊनलोड केल्यानंतर सतत मोबाईलवरही त्या बघितल्या जातात. त्यामुळे त्याचं व्यसन लागतं. दिवसाला किमान एकतरी रुग्ण या तक्रारीमुळे दाखल होतो. असे एकूण महिन्याला किमान ३० केसेस येतात. हे प्रमाण १० ते १५ टक्के एवढं आहे.


वाचा – ‘मोमो’ला आवरा…विद्यार्थ्यांना सावरा!


‘पब जी’ गेमचं ही आकर्षण

पॉकेमॉन गो आणि ब्लू व्हेल या दोन गेम्सनंतर आता तरुणांमध्ये वेड आहे ते म्हणजे पब जी गेमचं. हल्ली मुलं तासंतास पब जी गेम खेळताना दिसत आहेत. एका वेळेस १०० जण या पब जी गेम्समध्ये गुंततात. वेळेची मर्यादा नसल्यामुळे तरुण खेळत बसतात. गेममधील वाढत्या स्टेजेससोबत तरुणांचा वेळ ही या कसा जातो ते त्यांना कळत नाही. पण, सतत मोबाईलवरील इंटरनेटचा लहान मुलं आणि तरुणांवर वाढता प्रभाव असल्याचं दिसून येत आहे.

नेटफ्लिक्स म्हणजे काय?

हे स्ट्रीमिंग अ‍ॅप असून या माध्यमातून वर्षाला पैसे भरून सदस्यत्व घेऊन चित्रपट, वेबसीरिज, मालिका पाहता येतात. अ‍ॅपमधील कंटेट रात्रंदिवस मोबाइलमध्ये पाहण्याची सोय आहे.

First Published on: December 7, 2018 7:00 AM
Exit mobile version