गाढव झाले डॉक्टर! कोरोना योद्ध्यांचा मानसिक तणाव दूर करणार

गाढव झाले डॉक्टर! कोरोना योद्ध्यांचा मानसिक तणाव दूर करणार

गाढव झाले डॉक्टर! कोरोना योद्ध्यांचा मानसिक तणाव दूर करणार

संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना विषाणूसोबत लढत आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून आपल्या जीवाची पर्वा न करताना डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. यामुळे डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत. पण आता या कोरोना योद्ध्यांसाठी गाढव डॉक्टर झाले असून यांच्यावर गाढव उपचार करत आहे. हा अनोखा उपक्रम स्पेनमध्ये सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कोरोना योद्धे डॉंकी थेरेपी (Donkey therapy) घेण्यासाठी येते आहेत.

स्पेनमधील डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी तणावमुक्त होण्यासाठी डॉंकी थेरेपी घेत आहेत. ही थेरेपी कोरोना योद्ध्यांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. यामध्ये गाढव तणाव, नैराश्य आणि चिंता यासह शारिरीक आणि मानसिक आजारांवर मात करण्यात मदत करते. या थेरपीच्या वेळी मानसिकरित्या विचलित झालेले लोक गाढवाला मिठ्ठी मारतात. यामुळे त्यांना आराम मिळतो.

‘द हॅपी लिटिल डॉंकी’ (The Happy Little Donkey) या दक्षिण स्पेनमधील संस्थेने अल्झायमर रुग्ण आणि इतर मानसिक समस्या असलेल्या मुलांवर उपचारांसाठी डॉंकी थेरेपीचा वापर केला आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांसाठी जून २०२० पासून हा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकारच्या थेरपीचा संबंध घोड्यांशीही आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘गाढव मानसिक किंवा भावनिक आजारांवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे.’

‘Animal थेरेपी शारिरीक पातळीवर बदल घडवून आणते. माणूस प्राण्यांसोबत राहिल्यावर त्याच्या शरीरातील ऑक्टिटोसिन वाढते. तसेच तणावास कारणीभूत असलेले कोर्टिसोल कमी होते आणि एंडोफिन वाढते. ज्यामुळे बरे वाटते’, असे या प्रकल्पाचे सल्लागार मानसशास्त्रज्ञ मारिया जीसस आर्क यांनी सांगितले

या उपक्रमाचा अनुभव घेतलेल्या माद्रिदच्या रुग्णालयात काम करणाऱ्या २५ वर्षीय मोरॅल्सने सांगितले की, ‘रुग्णालयामध्ये सतत काम करत असल्यामुळे खूप तणाव वाढला होता. मी १० दिवसांच्या गाढवाला एक दिवस तिथे हातात घेऊन कुरवाळले. त्यामुळे मला खूप बरे वाटले. ‘


हेही वाचा – वर्षभरापासून फ्रिजमध्ये ठेवलेले नूडल्स खाऊन ९ जणांचा मृत्यू


 

First Published on: October 22, 2020 9:35 PM
Exit mobile version