जाणून घ्या TikTok वर कोट्यवधी रुपये कमवण्याचा फंडा

जाणून घ्या TikTok वर कोट्यवधी रुपये कमवण्याचा फंडा

सोशल मीडियावर टिकटॉकचा क्रेझ प्रचंड वाढत चालला आहे. आतापर्यंत या अॅपवर जगभरातील १.५ अब्ज युजर्स आहेत. विशेष म्हणजे भारतात या अॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. या वर्षात आतापर्यंत २७.७६ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. टिकटॉकमार्फत लोक आपल्यातील कलागुण लोकांपर्यंत सादर करण्याचा आणि त्यातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. अर्थात लाखो लोकांना त्याचा फायदा देखील झाला आहे. टिकटॉक हे फक्त कलागुणांना वाव देणारेच नव्हे तर लोकांचे मनोरंजन करणारे अॅप देखील आहे. या माध्यमातून युजर्सला वाढत्या फोलोअर्सची संख्या बघून समाधानी वाटत होतेच मात्र, आता त्यांना टिकटॉकमार्फत पैसे कमवता येणार असल्यामुळे त्यांना जास्त आनंद होणार आहे.

असे कमवा पैसे

खरंतर अनेक मोठमोठ्या कंपन्या टिकटॉकच्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला पैसे कमवण्याची संधी देत आहेत. itel या मोबाईल कंपनेनी टिकटॉकवर नुकतेच एक अभियान सुरु केले होते. या अभियानाला टिकटॉक युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. itel कंपनीने बनवलेल्या गाण्यावर एक टिकटॉक व्हिडिओ बनवून टाकायचा टास्क कंपनीने दिला होता. त्या व्हिडिओच्या बदल्यात itel कंपनी युजर्सला पैसे देणार आहे. फक्त itel नव्हेच तर Amazfit, Moov आणि Bingo सारख्या अनेक मोठ्या कंपन्या या अभियानाअंतर्गत युजर्सला पैसे कमवण्याची संधी देत आहेत. मात्र, यासाठी कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत.

पैसे कमवण्यासाठी ‘या’ आहेत अटी

टिकटॉकवर पैसे कमवण्यासाठी काही कंपन्यांनी युजर्सला पैसे कमवण्यासाठी संधी जरी दिली असली तरी यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. या कंपन्या आपल्या ब्रँडच्या प्रचारासाठी टिकटॉक अॅपवरील युजर्सशी संपर्क साधतात. मात्र, यासाठी युजर्सचे फॉलोअर्स जास्त असणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रतिभाली असाल तर तुम्हाला प्राथमिकता मिळेल.

First Published on: November 22, 2019 8:46 PM
Exit mobile version