पॉर्न फिल्ममध्ये पत्नीला बघून पतीला बसला धक्का

पॉर्न फिल्ममध्ये पत्नीला बघून पतीला बसला धक्का

सातवीच्या विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ दाखविल्याबद्दल शिक्षकाला अटक

बंगळुरू येथे राहणारा एक व्यक्ती मोबाईलवर पॉर्न फिल्म बघत होता. त्याचवेळी फिल्ममध्ये दिसत असलेल्या अनेक महिलांपैकी एका महिलेला बघून त्याला धक्काच बसला. कारण ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी होती. विशेष म्हणजे दोघेही पती (३३) पत्नी (३२) उच्चशिक्षित असून पती सॉफ्टवेअर इंजिनियर असून पत्नी डॉक्टर आहे.

पती उत्तर प्रदेशचा असून पत्नी कोलकाताची आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांची ओळख एका मॅट्रीमोनियल साईटवर झाली होती. त्यानंतर २०१८ साली त्यांनी लग्न केले. पण लग्नाआधी महिलेने तिचे एका पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते पण नंतर ब्रेकअप झाल्याचे पतीला सांगितले होते. पतीनेही मोठ्या मनाने झाले गेले विसरून नवीन सुरुवात करुया सांगत पत्नीला क्षमा केली. त्यानंतर दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. दोघांचे बरे चालले होते. पण याचदरम्यान पॉर्न फिल्म बघताना त्यात पत्नीला एका पुरुषांबरोबर बघून पतीला धक्का बसला. त्यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पण पत्नीने फिल्ममधला पुरुषा आपला पूर्वप्रियकर असून तो आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. त्यानंतर पतीने सामंजस्याने पत्नीला समजावले व त्यांच्यातील वाद संपत असतानाच जानेवारी महिन्यात अचानक त्याला अशा आणखी एका व्हिडिओत पत्नी वेगळ्या पुरूषासोबत दिसली. याबद्दल पत्नीला जाब विचारला असताना ‘लग्ना आधी अनेकांसोबत संबंध असल्याचे तीने उघड केले. मात्र हे व्हिडिओ ऑनलाइन कसे गेले हे ठाऊक नसल्याचे सांगितले आहे’. या नंतर निराश पतीने पत्नीला घटस्फोट देत पुढचे आयुष्य एकट्याने काढण्याचा निर्णय घेतला आहे.

पतीच्या निर्णयानंतर त्याने पुन्हा आपल्याकडे यावे यासाठी याचिका पोलिस कमिश्नर ऑफिसमधील कौंटुंबिक काउंसलिंग सेंटरमध्ये दाखल करण्यात आली आहे. मात्र पत्नीने आपल्यापासून अशा अनेक गोष्टी लपवल्या आहेत त्यामुळे दररोजच्या या त्रासाला कंटाळून त्याने पत्नीसोबत एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: February 5, 2020 3:47 PM
Exit mobile version