तुमच्याकडे २ हजाराची फाटलेली नोट आहे का? त्या बदल्यात बँक देणार इतकी रक्कम

तुमच्याकडे २ हजाराची फाटलेली नोट आहे का? त्या बदल्यात बँक देणार इतकी रक्कम

२ हजार रूपये

रोज दैनंदिन व्यवहार करताना आपल्याकडे न कळत फाटलेल्या नोटा देखील येतात. मात्र बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना किंवा बस, रिक्षातून प्रवास करताना उर्वरित पैसे घेताना ते न बघता आपण ठेऊन देतो आणि नंतर त्या पैशातील काही नोटा फाटक्या निघाल्यास आपण पश्चाताप करत बसतो. मात्र काही ठिकाणी या नोटा बदलून देखील दिल्या जातात. यासह अशा फाटलेल्या नोटा आपल्या बँकेत जाऊन देखील बदलता येतात. फाटलेल्या नोटा आरबीआयच्या नियमांनुसार तुम्हाला नव्या नोटा मिळू शकतात. दरम्यान, सरकारने सार्वजनिक बँकेत अशी फाटलेली नोट बदलून देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. खराब किंवा फाटलेली नोट जिच्या दोन्ही बाजूंनी सर्व नंबर दिसतील अशी नोट सार्वजनिक बँकेच्या काऊंटरवर तसेच आरबीआयच्या रिजनल ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्म न भरता देखील भरू शकतात, असेही सांगितले जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या फाटलेल्या नोटा परत करण्यासंदर्भात काही नियम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेच्या या नियमांच्या आधारे बँका फाटलेल्या नोटांच्या बदल्यात ग्राहकांना रिफंड देतात. फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण बँकेत करता येते. फाटलेल्या नोटांबद्दल लोकांचे मनात अनेकदा संभ्रम असतो. ५, १० रूपयांची नोट फाटली असेल तर लोकं इतका विचार करताना दिसत नाही मात्र मोठे मूल्य असेलेली नोट अर्थात २००० रूपयांची नोट फाटलेली असेल तर बँक त्या बदल्यात किती रक्कम देईल?, बँकेकडून या फाटलेल्या नोटेबद्दल योग्य तो परतावा मिळेल का? तर आरबीआयच्या नियमांनुसार, तुमची नोट किती फाटलेली आहे, यावर किती परतावा मिळेल हे अवलंबून आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २ हजार रुपयांची नोट ८८ वर्ग सेंटीमीटर असल्यास त्या नोटेचे पूर्ण पैसे मिळतील, तर ४४ वर्ग सेंटीमीटर असल्यास अर्धी किंमत मिळू शकते. याद्वारे, बँक सर्व प्रकारच्या नोटांची देवाणघेवाण करण्यास बांधील नाही, असे देखील सांगितले जात आहे. ही नोट जर पूर्णपणे खराब झाली असेल किंवा जळाली असेल, तर बँक अशा नोटा बदलण्यास नकारही देऊ शकतात. विशेष म्हणजे नोटा देवाणघेवाणीसाठी बँक आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. मात्र रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की अशी कोणतीही नोट बदलून देऊन नये जी जाणूनबुजून फाडलेल्या स्थितीत असेल. ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते.

First Published on: January 29, 2021 11:58 AM
Exit mobile version