फेसबुकला पिछाडीवर टाकत टिकटॉकची आघाडी

फेसबुकला पिछाडीवर टाकत टिकटॉकची आघाडी

फेसबुकला पिछाडीवर टाकत टिकटॉकची आघाडी

सोशल मीडियामध्ये सर्वात पसंतीचं व्यासपीठ असलेल्या फेसबुकला पिछाडीवर टाकत यंदा टिकटॉकने आघाडी घेतली आहे. २०१९ मध्ये फेसबुक डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ११ टक्क्यांनी घटली आहे. याचा फायदा टिकटॉकला होऊन टिकटॉकने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

अलिकडेच मोबाइल मार्केटिंग डाटा या कंपनीने सोशल मीडियाच्या रॅंकिंग प्रसिद्ध केल्या. त्यानुसार रॅंकिंमधील एकूण १० अॅप्समध्ये ७ अॅप्स हे सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन्स संबंधी अॅप्सचा समावेश आहे. फेसबुक डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या घटली आहे. असे असले तरी मागील दशकभरापासून सोशल मीडियात फेसबुकं आघाडीवर राहिले आहे. तर फेसबुक, फेसबुक मेसेंजर पाठोपाठ सर्वाधिक डाऊनलोड अॅप्समध्ये व्हॉट्सअॅपचा तिसरा क्रमांक आहे. दरम्यान, २०१९ मध्ये १२ हजार कोटी अॅप इन्स्टॉल करण्यात आले आहेत. २०१८ वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

विविध अॅप्सचे दहा वर्षांतील यूजर्स

मागील दहा वर्षांत फेसबुकचे ४६० कोटी, फेसबुक मेसेंजरचे ४४० कोटी, व्हॉट्सअॅपचे ४३० कोटी, इन्स्टाग्रामचे २७० कोटी, स्नॅपचॅटचे १५० कोटी, स्काईपचे १३० कोटी, टिकटॉकचे १३० कोटी, यूसी ब्राऊजरचे १३० कोटी, यूट्यूबचे १३० कोटी, ट्विटरचे १०० कोटी अॅप यूजर आहेत.

मनोरंजनासाठी या अॅप्सना पसंती

दरम्यान मनोरंजनासाठी लोकांकडून पसंती देण्यात आलेल्या अॅप्समध्ये नेटफ्लिक्स, टिंडर, पेंडोरा म्युझिक, टेनसेंट व्हिडिओ, आयक्यूयी, स्पॉटीफाय, यूट्यूब, एचबीओ नाऊ, क्वाई या अॅप्सचा समावेश आहे.

मुलांची या अॅप्सना पसंती

मुलं देखील हल्ली मोबाईलवर विविध गेम्स खेळताना दिसतात. सब वे सर्फर, कँडीक्रॅश, टेंपल रन २, माय टॉकिंग टॉम, क्लॅश ऑफ क्लास, पोऊ, हिल क्लाइंब रेसिंग, मिनियन रश, फ्रुट निंजा, ८ बॉल पूल यासारख्या अॅप्सना लहान मुलांनी पसंती दिली आहे.

First Published on: December 30, 2019 10:13 AM
Exit mobile version