मोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’

मोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’

सुरतमध्ये होतेय पाद स्पर्धा

पादणे, शिंकणे, ढेकर येणे या आपल्या शरीरातील नैसर्गिक क्रिया आहेत. शिंक किंवा ढेकर आपण चारचौघात देतो, त्यानंतर काही विनम्र लोक त्यावरही माफी मागतात. मात्र पादणे या क्रियेला समाजाने बहिष्कृत केलेले आहे. पोटात वायूचे चक्रिवादळ होत असले तरीही चारचौघात पादता येत नाही. त्यासाठी एकांतच लागतो. मात्र गुजरातच्या सुरतमध्ये चक्क पादण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे नाव What The Fart असे ठेवण्यात आले असून २२ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रुपये नोंदणी शुल्कही ठेवण्यात आले आहे.

 

या आगळ्यावेगळ्या स्पर्धेची कल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्यांचे नाव आहे यतीन संगोई. व्यवसायाने अभिनेता आणि गायक असलेल्या यतीन संगोई यांना ही कल्पना सुचण्याचा प्रसंगही हास्यास्पद असा आहे. संगोई आपल्या कुटुंबासोबत सिनेमा पाहायला गेले होते. सिमेना सुरु असताना तो मोठ्याने पादले. यावर उपस्थित प्रेक्षकांना हसू आवरलं नाही. यावेळी संगोई यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने म्हटले की, “जर पादण्याची स्पर्धा घेतली तर तू पहिला येशील” आणि त्याचक्षणी संगोई यांना ही चक्रम कल्पना सुचली.

रेडियो जॉकी देवांग रावल हे या स्पर्धेचे परिक्षक आहेत. रावल यांनी एका व्हिडिओद्वारे या स्पर्धेची संकल्पना मांडली आहे. मी तुमच्या पादण्याला ऐकेल, त्याच वास घेईल आणि समजूनही घेईल. Fart is Art अशी संकल्पना बाहेरच्या देशात आहे. अमेरिका, युरोप यासारख्या देशात पादण्याला चुकीचे समजले जात नाही, मात्र भारतातच पादण्याला नाक मुरडली जातात. सुरत असे एकमेव शहर आहे, जिथे नव्या कल्पनांचा स्विकार केला जातो. सुरतमध्ये या आमचा आचार, विचार आणि पादाचार पाहा, असे आवाहन देवांग रावल यांनी केले आहे.

First Published on: September 16, 2019 7:19 PM
Exit mobile version