International Left Handers Day: पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन, रतन टाटा यांच्यासहीत अनेक लोक डावखुरे

International Left Handers Day: पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन, रतन टाटा यांच्यासहीत अनेक लोक डावखुरे

जागतिक डावखुरा दिन

आज १३ ऑगस्ट जगभरात हा दिवस International Left Handers Day म्हणून साजरा केला जातो. १९९२ रोजी या पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात डावखुऱ्यांना चपण्या म्हटलं जातं. विशेषतः अध्यात्मिक कारणांमुळे डाव्यांकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याची आपल्याला सवय होती. मात्र जगभरातील लेफ्ट हँडर्सवर एकदा नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल इतकी मोठी नावे डाव्यांच्या यादीत आहेत. तर सर्वात आधी जाणून घेऊयात हा आगळावेगळा दिवस साजरा करण्यास सुरुवात कशी झाली?

१३ ऑगस्ट १९९२ रोजी लेफ्ट हँडर्स क्लबद्वारे एका इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटचा उद्देश असा होता की, डाव्यांना त्यांच्यातील कौशल्याचा साक्षात्कार व्हाव. सोबतच लोकांना डाव्यांचे फायदे-तोटे कळावेत. १९७६ साली पहिल्यांदा Dean R Campbell नामक व्यक्तिने डाव्यांचा दिवस साजरा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर जगभरात हा दिवस साजरा होऊ लागला.

डावे हे उजव्यांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत किंवा वेगळे तर बिलकुल नाहीत हे सांगण्यासाठी किंवा याबाबतची जागरुकता आणण्यासाठी अशा प्रकारचा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जगभरातील लोकसंख्येपैकी ७ ते १० टक्के डावखुरे आहेत. भारतासहीत अनेक देशांमध्ये डाव्यांना अवहेलना सहन करावी लागते.

जगभरातील यशस्वी डावे लोक

बराक ओबामा, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, ओपरा विनफ्रे असे अनेक लोक हे डावखुरे आहेत. तर भारतात देखील यशस्वी डाव्यांची कमतरता नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डावखुरे आहेत. मोदी लिहिताना उजव्या हाताचा वापर करतात. मात्र खाताना आणि खेळताना ते डावा हात वापरतात.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील डावे आहेत.

उद्योगपती रतन टाटा देखील डावे आहेत. त्यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून इंडियन लेफ्ट हँडर क्लबला स्कॉलरशिपही दिली आहे.

First Published on: August 13, 2020 9:35 AM
Exit mobile version