चेहरा विद्रुप करून व्हायरल झालेली ‘झोम्बी अँजेलिना जोली’ला १० वर्ष जन्मठेप

चेहरा विद्रुप करून व्हायरल झालेली ‘झोम्बी अँजेलिना जोली’ला १० वर्ष जन्मठेप

'झोम्बी अँजेलिना जोली'ला १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

काही दिवसांपूर्वी एका तरूणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आपण हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली प्रमाणे दिसावं यासाठी या मुलीने चेहऱ्यावर अनेक सर्जरी केल्या होत्या. दरम्यान अँजेलिना जोलीच्या भयावह लूकमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेल्या इराणच्या सहर तबरला १० वर्षांसाठी तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तबरवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहे.

फतेमिह ख‍िशवंद उर्फ सहर तबर तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अँजेलीना जोलीच्या ‘झोम्बी’ च्या रुपात दिसली आहे. जोलीसारखे दिसण्यासाठी सहर तबरने ५० प्लास्टिक सर्जरी केल्या असल्याचीही चर्चा आहे. तबरने केलेल्या तिच्या या सर्जरीच्या प्रयोगाला ती एकप्रकारची कला आणि सर्जनशीलता असल्याचे सांगते.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वराविषयी निंदा करणे, गैरमार्गाने पैसे कमावणे आणि तरूण वर्गास भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित करणे यासारखे काही आरोप तबर हिच्यावर आहेत. तबर हिला सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे यावर्षी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र आता तिला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तबरने कॉस्मेटिक सर्जरी करून तिचा चेहरा विद्रुप केला होता. या फोटोंमध्ये तबरचा चेहरा अँजेलीना जोलीसारखा दिसतो, जो अगदी भयावह आहे. विशेष म्हणजे तबर ही स्वतःला अँजेलीना जोलीची सर्वात मोठी फॅन असल्याचे सांगते. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०१९ साली तबर हिला तरूणांना काही विषयांवर भडकवण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ईश्वराविषयी निंदा करण्याच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली आहे. यासर्व प्रकारानंतर तिचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील डिलीट करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर फतेमिह खिशवंद हिला दोषी ठरविण्यात आले आहे.


अँजेलिना जोली प्रमाणे दिसण्यासाठी ५० सर्जरी केलेल्या तरूणीला कोरोना!
First Published on: December 14, 2020 1:41 PM
Exit mobile version