Job Alert: बीटेक झालंय का? मुंबई हायकोर्टात निघाली १११ पदांसाठी भरती

Job Alert: बीटेक झालंय का? मुंबई हायकोर्टात निघाली १११ पदांसाठी भरती

मुंबई हायकोर्ट

तुम्ही B.Tech पुर्ण केलंय का? तुमच्याकडे B.Tech ची डिग्री असेल तर तुमच्यासाठी मुंबई हायकोर्टात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) मध्ये सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदाच्या जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. सिस्टिम ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिकची बीटेक डिग्री असणे आवश्यक आहे. तर सीनियर सिस्टिम ऑफिसरसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगची बीटेक डिग्री असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेच्या निकषावर बसणाऱ्या उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या लिंकवर आपले अर्ज सादर करावेत.

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी लिंक – https://bhc.gov.in/bhcsysadmin/Advertisement24092020.pdf

मुख्य संकेतस्थळावर जाण्यासाठी लिंक – https://bhc.gov.in/bhcsysadmin/

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

अर्ज सुरु होणार – २४ सप्टेंबर २०२० पासून

अर्ज भरण्याची शेवटची मुदत – ८ ऑक्टोबर पर्यंत

मुंबई हायकोर्टातील पदांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली आहे. एकूण १११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये सिनिअर सिस्टिम ऑफिसरसाठी ३१ तर सिस्टिम ऑफिसरसाठी ८० उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज भरण्यापुर्वी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही जाहीरात एकदा वाचून घ्या. शैक्षणिक पात्रतेसोबतच, वय आणि इतर निकष तुम्हाला जाहीरातीत वाचायला मिळतील.

First Published on: September 25, 2020 6:56 PM
Exit mobile version