मुंबईला झोडपल्यानंतर सोशल मीडियावरही ‘मेम्स’चा पाऊस!

मुंबईला झोडपल्यानंतर सोशल मीडियावरही ‘मेम्स’चा पाऊस!

गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प झाल्या आहेत. तर सोशल मीडियावर पावसासंबंधीचे मेम्स आणि जोक्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या कोणतीही घटना घडली की सोशल मीडियावर त्याचे जोक्स झालेच म्हणून समजा. यंदाच्या पावसावरही फेसबुक, ट्विटवर, व्हॉट्सअॅपवर सध्या भन्नाट जोक्स आणि मेम्स व्हायरल होत आहेत. अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करत प्रशासनाने आज सुट्टी जाहीर केली असून त्यातच आज भारत-बांगलादेश यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे. त्यामुळे घरी बसून मॅच पाहण्याचा आनंद मुंबईकर लुटणार असून त्यावरही जोक्स होत आहेत.

तुंबलेली मुंबई झाली जलमय…

पुन्हा हवामान खात्याचा अंदाज चुकला?

मुंबई पुन्ही मुसळधार पावसात बुडाली…

मुसळधार कोसळणाऱ्या पावसावर मजेशीर व्यंग

पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने महापालिकेला जबाबदार ठरवलं जात आहे

महत्त्वाची सुचना….सर्वांसाठी

First Published on: July 2, 2019 4:06 PM
Exit mobile version