Video : नदीत प्री वेडिंग फोटोशूट करताना पती-पत्नीला घेऊन बोट उलटली

Video : नदीत प्री वेडिंग फोटोशूट करताना पती-पत्नीला घेऊन बोट उलटली

सध्या प्री वेडिंग फोटोशूट हा सगळ्या तरूणाईचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. प्री वेडिंग शूट हे नवीन जोडप्यांतील प्रेम, रोमान्सच्या काही आठवणी लक्षात राहण्यासाठी कॅमेऱ्यात कैद केल्या जातात. परंतु, काही दिवसांपुर्वीच केरळ मधील एका तरूण जोडप्याच्या प्री वेडिंग फोटोशूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील घडलेल्या घटनेची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्री वेडिंग फोटोशूटसाठी वापरण्यात आलेल्या एका नावेवर बसले होते. यावेळी, फोटोशूट सुरू असताना एकमेकांचे चुंबन घेण्याचा क्षण फोटोग्राफरला आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचा होता. हे फोटोशूट करत असताना अचानक नाव नदीत उलटली आणि हे जोडपं नावेतून पाण्यात पडले. या गंमतीशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याचे प्री वेडिंग फोटोशूट पठाणमथिट्टा जिल्ह्यातील कदममणित्ता येथील पद्मा नदीच्या किनाऱ्यावर होत होते. व्हिडिओमध्ये दिसत असणाऱ्या फोटोग्राफरने या जोडप्याला सूचना देत त्यांना चुंबन घेण्यास सांगितले होते, त्यांच्या डोक्यावर केळीचे पान पकण्यास सांगितले, अशी फोटोग्राफरने जोडप्याला सूचना दिली होती. त्यानुसार हे जोडपं तयारीत असताना त्यांचा तोल गेला आणि ते दोघे ही नदीत पडले.

 

या गंमतीशीर पण फजिती झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊन चर्चेचा विषय ठरत आहे. हे फोटोशूट केलेल्या कंपनीच्या फेसबूक पेजवर व्हिडिओने चांगली पंसती मिळवत १.९ लाखांहून अधिक ‘views’ मिळवले आहे.  या पोस्टला ४००० हून अधिकांनी ‘likes’ करत शेअर होताना ही दिसत आहे.

First Published on: April 19, 2019 12:22 PM
Exit mobile version