जोडप्यानं म्हातारपणात केलं वेडिंग फोटोशूट; सोशल मीडियावर होतंय व्हायरल

जोडप्यानं म्हातारपणात केलं वेडिंग फोटोशूट; सोशल मीडियावर होतंय व्हायरल

लग्नाला ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर केरळमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपले वेडिंग फोटोशूट केले. या ‘यंग कपल’चे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यांच्या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. या फोटोशूटला इंस्टाग्राम यूजर photographey_athreya ने शेअर केले आहेत. त्याने असे सांगितले की, ‘मी माझ्या आजी- आजोबांना त्यांच्या लग्नाच्या फोटोंबद्दल विचारले त्यावेळी त्याच्या जवळ त्यांच्या लग्नातील कोणत्याच क्षणांचे फोटो नव्हते, तेव्हा मी त्याचे वेडिंग फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला.’

केरळमधील इड्डकी जिल्ह्यातील राहणारे Chinnama आणि Kochukutty यांच्या लग्नाला ५८ वर्ष पूर्ण झाले असून त्या अविस्मरणीय सोहळ्याचे त्याच्याकडे आठवण म्हणून एकही फोटो नव्हता. Kochukutty यांना फोटोशूट करण्याची इच्छा होती. यानंतर त्यांच्या नातवानं त्यांच्या मित्रांसह दोघांचे मस्त वेडिंग फोटोशूट केले.

या फोटोशूटसाठी दोघेही मस्त तयार झालेत. एका छान ठिकाणी त्यांचे फोटोशूट केले गेले. त्यांच्या आजोबांनी काळ्या रंगाचा सूट आणि आजीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये आजी नववधूपेक्षा कमी दिसत नव्हती. या दोघांच नातं त्यांच्यातील प्रेम पाहून सोशल मीडियावर नेटकरी त्या दोघांचे चाहते झाले आहेत.

First Published on: October 4, 2020 4:18 PM
Exit mobile version