केरळ महापूर : बिग बीही मदतीसाठी सरसावले!

केरळ महापूर : बिग बीही मदतीसाठी सरसावले!

काही दिवस सलग सुरु राहिलेल्या जोरदार पावसामुळे केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या महप्रलयात लाखो लोकांचा कष्ट करून उभा केलेला संसार डोळ्यादेखत उद्धवस्त झाला. तरीही केरळवासीय या संकटात ताठ मानेने उभे आहेत, जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.दरम्यान केरळच्या मदतीसाठी संपूर्ण देश पुढे सरसावला आहे. देशभरातून लोक आपल्याला जमेल तशी आणि तितकी मदत पोहचवत आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळवासीयांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अमिताभ यांनी नुकतीच केरळवासीयांना तब्बल ५१ लाख रुपयांची मदत पाठवली आहे. इतकंच नाही तर बिग बींनी केरळमधील स्थानिक लोकांसाठी २५ पॅन्ट्स, २० शर्ट्स, ४० चपलांचे जोड तसंच ८० जॅकेट्स आणि काही स्कार्फसुद्धा पाठवल्याचं समजतंय. उपलब्ध माहितीनुसार अमिताभ यांनी केरळमध्ये अडकलेल्या लोकांसाठी तसंच बचावकार्यासाठी केरळात गेलेल्यांसाठी एकूण ६ मोठे ट्रंक भरुन कपडे आणि अन्य काही वस्तू पाठवल्या आहेत. याआधी शाहरूख खान, कमल हसन, जॅकलिन फर्नांडीस, धनुष आणि दलकेर सलमान या बॉलीवूड सेलिब्रीटीजनीही केरळला मदत पाठवली होती.

केरळला आता मदतीचा महापूर

केरळमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाऊसाचा महापूर आला होता. त्यानंतर आता संपूर्ण जगभरातील लोक तसंच काही सामाजिक संस्था केरळच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यामुळे आता केरळामध्ये मदतीचा महापूर आल्याचं बोललं जात आहे. आढावा घेऊया केरळमध्ये पोहचलेल्या काही मदतींचा :

ससूनचे २६ डॉक्टर केरळला रवाना
डबेवाल्यांकडून १ हजार किलो तांदूळ
सिद्धिविनायक मंदिराकडून एक कोटी
आयआयटी मुंबईसह इतर कॉलेजांनी केली मदतीचा
सिनेसृष्टीकडूनही मदतीचा हात
युएईची ७०० कोटींची मदत

फक्त लढ म्हणा…

 

First Published on: August 23, 2018 5:53 PM
Exit mobile version