Coronavirus crisis: ‘घरीच थांबलात तर वाईन्स शॉप लवकरच उघडणार’

Coronavirus crisis: ‘घरीच थांबलात तर वाईन्स शॉप लवकरच उघडणार’

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपुर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन झालेला आहे. मात्र अनेकांना घरी बसायची सवय नसल्याने त्यांच्यात नकारात्मकता निर्माण झाली आहे. एवढे दिवस करायचे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेका तळीरामांना तर रोज घसा ओला केल्याशिवाय झोप येत नाही. काही तळीरामांनी तर आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यावर उतारा म्हणून प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवर याने एक कॉमेडी व्हिडिओ शुट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपल्या शैलीत लोकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.

सुनील ग्रोवरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो की, “तुम्ही लोक जर घरीच थांबलात तर मद्याची दुकाने लवकरच उघडली जातील. ज्यांना असं वाटतं त्यांनी आपापल्या घरीच थांबावे.” सुनीलचा सांगायचा अर्थ असा की, लोक जर लॉकडाऊनचे पालन न करता घराबाहेर पडत राहिले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी घरीच थांबण्यासाठी ही अनोखी शक्कल त्याने लढवली आहे.

सुनील ग्रोवरच्या या व्हिडिओला इंटरनेटवर चांगलीच प्रसिद्धि मिळाली असून तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. लोकांना त्याची ही कल्पना भारी वाटली. पण त्याने ही गोष्ट थट्टेत सांगितली असल्याने ती गांभीर्याने घेऊ नका. सुनील प्रमाणेच ऋषी कपूर यांनी देखील काही दिवसांपूर्वी वाईन्स शॉप सुरु करावेत अशी मागणी केली होती. तर महाराष्ट्रातील एका तळीरामाने तर चक्का व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन तासांसाठी वाईन्स चालू ठेवा, अशी विनंती केली होती.

 

 

First Published on: April 3, 2020 11:50 PM
Exit mobile version