World Cup: लंडनच्या रस्त्यावर वाजलं ‘लॉलीपॉप लागेलू’ भोजपूरी गाणं; व्हिडिओ व्हायरल

World Cup: लंडनच्या रस्त्यावर वाजलं ‘लॉलीपॉप लागेलू’ भोजपूरी गाणं; व्हिडिओ व्हायरल

लंडनच्या रस्त्यावर वाजलं भोजपरी गाणं

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा हंगाम सुरु आहे. आज भारताचा न्यूझीलँड संघासोबत तिसरा सामना होत आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. त्यानंतर लंडनच्या रस्त्यावर भारतीय चाहत्यांसोबत लंडनवासी चक्क ‘लॉलीपॉप लागेलू’ या प्रसिद्ध भोजपरी गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारत जिंकल्याचे सेलिब्रेशन लंडनच्या रस्त्यावर भोजपरी गाण्यावर होत असल्यामुळे इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध होतोय.

‘लॉलीपॉप लागेलू’ हे गाणं भारतात चांगलंच प्रसिद्ध आहे. पार्टी, लग्न, सार्वजनिक कार्यक्रमापासून ते थेट मुंबईत गणपतीच्या मिरवणुकीतही हे गाणं वाजवलं जातं. आता ते थेट लंडनच्या रस्त्यावरही गाजू लागलं आहे. हा व्हिडिओ वर्ल्ड कप दरम्यानचाच आहे का? याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र या व्हिडिओत एका डीजेच्या व्हॅनवर भारताचा झेंडा लावल्याचे दिसत आहे. गाडीमागे हजारोंच्या संख्येने परदेशी नागरिक ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्यावर आपली ‘कमरीया’ हलवताना दिसत आहेत.

 

First Published on: June 13, 2019 1:43 PM
Exit mobile version