जयंती बापूंची, ट्रेंडिंगवर नाथूराम गोडसे जिंदाबाद

जयंती बापूंची, ट्रेंडिंगवर नाथूराम गोडसे जिंदाबाद

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांधीजींना अभिवादन केलं. याशिवाय, सोशल मीडियावर गांधीजींना अभिवादन करत बापूंचे विचार शेअर केले जात आहेत. ट्विटरवर #GandhiJayanti ट्रेंडिंगवर असताना दुसरीकडे #नाथूरामगोडसेजिंदाबाद ट्विटरवर ट्रेंडिंग करत होतं.

ट्विटरवर #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद ट्विट १ लाखाहून अधिक करण्यात आले आहेत. यामध्ये काहींनी देश बचा गये नाथूराम असं देखील म्हटलं आहे. राष्ट्रपिताबद्दल अशा पध्दतीने चर्चा करणे खूप गंभीर आहे. काहींनी गोडसे अमर रहे असे ट्विट देखील केले आहेत.

 

First Published on: October 2, 2020 3:32 PM
Exit mobile version